Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल

पुढील २ महिन्यांत महामार्गासाठी नियोजित जागेची मोजणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये शेती क्षेत्र, पिके, झाडे या सर्वांची मोजणी केली जाणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 01, 2025 | 09:55 PM
Shaktipeeth ExpressWay: शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला; तब्बल 12 हजार शेतकरी उचलणार ‘हे’ पाऊल
Follow Us
Close
Follow Us:

कोल्हापूर:  शेतजमिनी उध्वस्त करणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानावर १२ मार्चला आयोजित केलेल्या मोर्चात  जिल्ह्यातील बारा हजार शेतकरी आपल्या बायका मुलांसह सहभागी होण्याचा निर्धार  आजच्या संघर्ष समितीच्या बैठकीत करण्यात आला.

या मोर्चात सहभागी होण्यासाठी नियोजन करण्यासाठी आज शनिवारी कोल्हापुरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्ह्यातून दहा हजार शेतकरी या मोर्चाला जाणार असल्याचे काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सांगितले. शक्तिपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी १२ मार्चला मुंबईत बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा राज्यव्यापी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चासाठी कोल्हापुरातील अजिंक्यतारा कार्यालयात नियोजना करिता शेतकऱ्यांची बैठक बोलवण्यात आली होती. यावेळी माजी आमदार के. पी. पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख विजय देवणे, गिरीश फोंडे, सम्राट मोरे, संपत देसाई आदी उपस्थित होते.

राज्य सरकारने कोणाच्या भल्यासाठी या महामार्गाची आखणी केली आहे. या मार्गामुळे हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी जाऊन ते भूमिहीन होणार आहेत. त्यामुळे या मार्गाला रद्द झालाच पाहिजे. अशी भूमिका सर्वांची आहे त्याचबरोबर जिल्ह्यातील चार आमदारांच्या याला विरोध आहे.

या महामार्गाला विरोध असताना देखील  मुख्यमंत्र्यांनी पुन्हा महामार्ग कार्यान्वित करण्याचा घाट घातला आहे परंतु कुठल्याही परिस्थितीत हा मार्ग रद्द करू असा निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले राज्यातील बारा जिल्ह्यातून शेतकरी येणार आहेत.  शासनाने महामार्ग रद्द करू अशी घोषणा केली होती. मात्र निवडून येताच पुन्हा एकदा हा महामार्ग लादला जात आहे. त्यामुळे कदापिही अन्याय खपवून घेणार नाही असे ही त्यांनी सांगितले.

शक्तिपीठ महामार्गासाठी क्षेत्र मोजणीचे सरकारचे आदेश

शेतकऱ्यांच्या विरोधामुळे वादात अडकलेल्या नागपूर ते गोवा महाराष्ट्र शक्तिपीठ द्रुतगती महामार्गासाठी राज्यातील अकरा जिल्ह्यांतील क्षेत्र मोजणीचे आदेश दिले शासनाने दिले  आहेत. रस्ते विकास महामंडळाने बुधवारी ऑनलाईन बैठक घेऊन त्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गाला समांतर जाणारा शक्तिपीठ महामार्ग करू नये, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Shaktipeeth: शक्तिपीठ महामार्गासाठी क्षेत्र मोजणीचे सरकारचे आदेश; कोल्हापूरमध्ये विरोधाचे कारण काय?
पुढील २ महिन्यांत महामार्गासाठी नियोजित जागेची मोजणी पूर्ण करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत. यामध्ये शेती क्षेत्र, पिके, झाडे या सर्वांची मोजणी केली जाणार आहे. त्यासाठी एजन्सी नेमल्या आहेत.  शक्तिपीठ महामार्गाला विविध पातळ्यांवर विरोध सुरू आहे. त्यात प्रामुख्याने शेतजमीन अधिग्रहणाच्या मोबदल्याचा वाद मुख्य आहे. समृद्धी महामार्गाप्रमाणे रेडिरेकनरच्या चारपट मोबदला हवा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. काही जाणकारांनी रत्नागिरी ते नागपूर राष्‍ट्रीय महामार्गाला समांतर असणारा हा महामार्ग अनावश्यक असल्याची भूमिका घेतली आहे. हा सर्व विरोध डावलून सरकारने आता भूमापनाचे आदेश दिले आहेत.

Web Title: Twelve thousand farmers against shaktipeeth expressway kolhapur cm devendra fadnavis and satej patil marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 01, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • devendra fadanvis
  • kolhapur news
  • Satej Patil
  • Shaktipeeth Expressway

संबंधित बातम्या

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 
1

Kolhapur News : उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर शैक्षणिक कार्यक्षमता प्रतवारीत प्रथम क्रमांक 

Satej Patil On Gokul : ‘गोकुळ’वरून महायुतीवर निशाणा; लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्त्वाचा
2

Satej Patil On Gokul : ‘गोकुळ’वरून महायुतीवर निशाणा; लोकशाहीत मतदानाचा अधिकार महत्त्वाचा

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ
3

Kolhapur News : वादळी वाऱ्यामुळे लग्न मंडप तुटला; अवकाळी पावसाने कोल्हापुरकरांची तारांबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.