पुणे : पावसाळ्यात झाड रस्त्यावर कोसळून अपघात होण्याच्या घटना नेहमी होत असतात. आता सध्या राज्यात पावसाने थोडी उसंत घेतली असली तरी दुर्घटना होण्याचं प्रमाण काही कमी झालेलं नाही. पुणे-नाशिक महामार्गावर भरधाव दिचाकीवर झाड कोसळून दोघं जण ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास हा अपघात घडल्याचं सांगण्यात येत आहे. समाधान नथू पाटील आणि निलेश राजेश शिंगाळे अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.
[read_also content=”निर्दयतेचा कळस, स्वत:च्या 10 महिन्याच्या पुतण्याला काकानं विहिरीत ढकलून मारलं https://www.navarashtra.com/crime/uncle-killed-his-10-month-pld-nephew-by-pushing-him-in-well-nrps-312667.html”]
शनिवारी सकाळच्या सुमारास भोसरी पोलीस (Bhosari Police Station) ठाण्यासमोरच ही काळीज हेलावून टाकणारी घटना घडली. समाधान नथू पाटील आणि निलेश शिंगाळे हे दोन्ही तरुण पुणे-नाशिक माहामार्गावरुन जातं होते. भोसरी जवळ येताच अचानक त्यांच्यावर झाड कोसळलं. झाड कोसळ्यावर दुचाकी अनियंत्रीत होऊन खाली कोसळली. दोघांनाही डोक्यावर जबर मार बसल्याने रक्तस्त्राव झाला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या दोघांकडे हेल्मेट होतं. मात्र मार इतका प्रचंड वेगाने झाला होता, की रक्तस्त्राव होऊ दोघेही तरुण ठार झाले.
[read_also content=”तुमची वस्तू आता लवकरात लवकर येणार घरी; अमेझॉन आणि रेल्वेमध्ये करार https://www.navarashtra.com/business/your-item-will-arrive-at-home-as-soon-as-possibleamazon-and-the-railways-deal-nrrd-312684.html”]