वालचंदनगर : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या दोन महिलांचा (Two Women Killed) अज्ञात वाहनाने चिरडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या काही अंतरावर घडली. अनिता शिवाजी शिंदे (वय ४०), अर्चना श्रीशैल्य सन्मट (वय ४२, दोघीही रा. जंक्शन, आनंदनगर ता. इंदापूर) असे मयत झालेल्या महिलांची नावे आहेत. बुधवारी पहाटेच्या सुमारास त्या फेरी मारायला गेल्या होत्या.
संत तुकाराम महाराज राष्ट्रीय मार्गावर वालचंदनगर रोडवर जात असताना वालचंदनगर पोलीस ठाण्यासमोर अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये अनिता शिवाजी शिंदे, अर्चना श्रीशैल्य सन्मट या दोघी गंभीर जखमी झाल्या. त्यांना स्थानिकांनी उपचारासाठी बारामती येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बारामतीतील सिल्व्हर ज्युबिली शासकीय उपजिल्हा रुग्णालयात या दोघींच्या स्वविच्छेदनाची प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, वालचंदनगर पोलिसांकडून अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्दैवी घटनमुळे जंक्शन परिसरावर शोककळा पसरली आहे.