Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Uday Samant : “कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता”, उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका

निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 02, 2025 | 05:36 PM
"कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता", उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका

"कपड्यांच्या बॅगांना पैशांची बॅग संबोधणे ही राजकीय अपरिपक्वता", उदय सामंत यांची वैभव नाईकांवर टीका

Follow Us
Close
Follow Us:
  • पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला
  • उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांचे आरोप
  • निवडणुकीसाठी मागील १० दिवसांपासून प्रचार करत आहेत
रत्नागिरी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत मालवण नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशातच आता या पैशांच्या बॅगांवरुन केलेल्या आरोपांचा उदय सामंत यांनी समाचार घेतला आहे. नगर परिषद निवडणूक प्रचारासाठी आलेले शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पैशांच्या बॅगा सोबत आणल्या होत्या असा उबाठाचे माजी आमदार वैभव नाईक यांचे आरोप म्हणजे राजकीय अपरिपक्वता आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना उप नेते व राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली.

 विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; मंत्री शिवेंद्रसिंह राजेंचे टीकास्त्र

मंत्री सामंत यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री शिंदे हे नगर परिषद आणि नगर पालिका निवडणुकीसाठी मागील १० दिवसांपासून प्रचार करत आहेत. मागील आठवडाभर घरी न जाता प्रचार करत असून या दौऱ्यात ते मुक्काम करतात. त्यामुळे मालवणमध्ये येताना त्यांच्यासोबत कपड्याच्या बॅगा होत्या, मात्र नाईक यांनी या बॅगांमध्ये पैसे असल्याचा बालिश आरोप लावला, असा टोला मंत्री सामंत यांनी लगावला. उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केल्यानंतर उबाठा खूश होतील, असा नाईक यांचा गैरसमज असावा त्यामुळेच नैराश्यातून त्यांनी आरोप केला, असे मंत्री सामंत म्हणाले. जे नेते घरातून बाहेरच पडत नाहीत त्यांना बॅग घेऊन जाण्याची परिस्थितीच निर्माण होत नाही, अशी टीका मंत्री सामंत यांनी उबाठावर केली.

सिंधुदुर्गात नैसर्गिक आपत्तीवेळी शिंदे यांनी मदत केली होती. अनेक घरांचे छत बनवून दिले. ही मदत लोकांसाठी नव्हती तर वैभव नाईक यांच्या राजकीय कारकिर्दीला झळ बसू नये, म्हणून देखील होती. आपत्ती काळात नाईक कुठेही फिरले नव्हते मात्र शिंदे यांनी मतदार संघात भरघोस मदत केली. मात्र नाईक यांना या मदतीचा विसर पडला. यातून नाईक यांची राजकीय अपरिपक्वता दिसून येते, अशी खरमरीत टीका मंत्री सामंत यांनी केली. नाईक शिवसेनेसोबत आले नाहीत, याचा कधीही मनात राग न ठेवता त्यांना लागेल ती मदत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केली. राजकारणात विरोधात असतानाही जेव्हा मदत मिळते, तेव्हा त्याची जाणीव ठेवायला हवी, असा सल्ला मंत्री सामंत यांनी यावेळी नाईक यांना दिला. ते पुढे म्हणाले की, हजारो कार्यकर्ते हेच शिंदेंची खरी ताकद आहे. त्यांना पैसे वाटण्याची गरज नाही.

ते पुढे म्हणाले की महायुतीचे तिन्ही नेते जेव्हा प्रचारासाठी जातात तेव्हा कुठेही मित्र पक्षांवर टीका करत नाहीत. रत्नागिरी जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सभा घेतल्या. ईश्वरपूरमध्ये महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी आले होते. नेते परिपक्व आहे ते एकमेकांवर टीका करत नाही. महायुती टिकवण्यासाठी प्रत्येकाचे योगदान असले पाहिजे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.

 सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर

Web Title: Uday samant criticism of vaibhav naik on eknath shinde accused of having bag with money

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 05:36 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Uday Samant
  • vaibhav naik

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन
1

Maharashtra Politics: “भाजप आपला मित्र…”; एकनाथ शिंदेंचे नगरसेवकांना मार्गदर्शन

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका
2

Political News: शिंदेंची मागणी, भाजपची चुप्पी! मुंबईच्या महापौराबाबत ४८ तासांनंतरही पेच कायम; तर ‘उबाठा’ची सावध भूमिका

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?
3

फोडाफोडीचा खेळ आता भाजप अन् शिंदेतच, संजय राऊत शिंदेंच्या नगरसेवकांपर्यंत पोहोचणार?

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…
4

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिवसेनेचा महापौर? वंचितच्या 2 नगरसेवकांनी थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.