Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: सातारा पालिकेत राजकीय घडामोडी! उदयनराजे समर्थक नगरसेवकांची दांडी; अवघ्या ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी

सातारा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत उदयनराजे समर्थक नगरसेवक अनुपस्थित राहिले. मात्र, कोरम पूर्ण झाल्याने ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी देत ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 23, 2026 | 05:39 PM
Satara News: सातारा पालिकेत राजकीय घडामोडी! उदयनराजे समर्थक नगरसेवकांची दांडी; अवघ्या ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी
Follow Us
Follow Us:
  • सातारा पालिकेत राजकीय घडामोडी!
  • उदयनराजे समर्थक नगरसेवकांची दांडी
  • अवघ्या ३० मिनिटांत ४६ विषयांना मंजुरी
सातारा, दि. २३ (प्रतिनिधी): सातारा नगरपालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत अनपेक्षित राजकीय घडामोडी घडल्या. खासदार उदयनराजे भोसले समर्थक नगरसेवक सभेला अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या सहभागाशिवायच सभा पार पडली. मात्र, आवश्यक कोरम पूर्ण झाल्याने सभागृहाने अवघ्या अर्ध्या तासात ४६ विषयांना मंजुरी देत शहर विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या निर्णयांवर शिक्कामोर्तब केले. सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमोल मोहिते होते.

५० सदस्यीय सभागृहातील २८ नगरसेवक उपस्थित राहिल्याने सभेचे कामकाज नियमानुसार सुरू झाले. सभेपूर्वी सर्व काही सुरळीत असल्याचे चित्र असताना काही खासदार गटाच्या नगरसेवकांनी अचानक अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याने पालिका वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. मागील सर्वसाधारण सभेच्या इतिवृत्तातील काही नोंदींवरून मतभेद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. नंतर संबंधित मजकूर वगळण्यात आल्याचा दावा करण्यात आला असला, तरी गैरहजेरीमुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आले.

सभेत शहरातील विकासकामांना गती देणाऱ्या विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, गॅस पाइपलाइनच्या कामामुळे उकरण्यात आलेल्या पाच प्रभागांतील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता, शिवतीर्थ परिसरात हायमास्ट दिवे उभारणे, सुधारित पाणीपुरवठा योजना क्रमांक दोनला मंजुरी तसेच पालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या विकास आराखड्यास हिरवा कंदील देण्यात आला.

Satara News: सातारा नगरपरिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; मालमत्ता कर, रस्ते दुरुस्तीसह तब्बल ४० महत्त्वाच्या विषयांवर होणार निर्णय

सभेतील सर्वाधिक महत्त्वाचा निर्णय भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराविरोधातील कारवाईचा तसेच 2025 ते 31 यासाठी चतुर्थ वार्षिक पाहणी करण्यासाठी एजन्सी नेमणे हे विषय चर्चेचे ठरले. भुयारी गटार योजनेचे नियोजित मुदतीत काम पूर्ण करण्यात अपयश आल्याने संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्याच्या प्रस्तावाला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. या निर्णयामुळे सार्वजनिक कामांमध्ये दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांविरोधात पालिका कठोर भूमिका घेत असल्याचा संदेश दिला गेला. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सभेचे कामकाज अवघ्या ३० मिनिटांत पूर्ण झाले. सभासचिव वर्षा पाटील यांनी विषयांचे वाचन केले. काही विषयांवर उपसूचना मांडल्यानंतर उर्वरित प्रस्तावांना सभागृहाने मंजुरी दिली.

सभेनंतर भाजपचे गटनेते अविनाश कदम यांनी पक्षात कोणतीही गटबाजी नसल्याचा दावा केला. पक्षातील सर्व नगरसेवकांमध्ये समन्वय असून पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनानुसारच पालिकेचे कामकाज सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काही सदस्य अनुपस्थित राहिल्यामुळे पक्षात मतभेद असल्याचा निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. नगरसेवकांची गैरहजेरी, अल्पावधीत मंजूर झालेले ४६ विषय, भुयारी गटार योजनेतील ठेकेदारावरील कारवाई आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांमुळे गुरुवारची सर्वसाधारण सभा शहराच्या राजकीय वर्तुळात विशेष चर्चेचा विषय ठरली आहे.

सातारा एमआयडीसीच्या विकासाला वेग; उद्योगमंत्री सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली उच्चस्तरीय बैठक

Web Title: Udayanraje bhosale supporters absent satara municipal council approves 46 projects in 30 minutes marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!
1

Satara DCC Bank Election: सातारा जिल्हा बँक निवडणूक अंतिम टप्प्यात; ११ सप्टेंबरला मतदार यादी होणार प्रसिद्ध!

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार
2

AI मॉर्फिंगवरून साताऱ्यात शिवेंद्रसिंहराजे समर्थक आक्रमक; यूट्यूब चॅनेलविरोधात शहर पोलिसांत तक्रार

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात
3

ड्रॅगन पेटला अन् राजवाड्यात उडाली पळापळ; दोन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी
4

Satara Ganesh Visarjan: सातारा पालिकेची यंत्रणा अलर्ट! बुधवार नाक्यावरील कृत्रिम तळ्याची नगराध्यक्षांकडून पाहणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.