Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ठाकरेंना धक्का; ‘हे’ नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; माजी नगरसेवक म्हणाले, “माझी शिवसेना, उद्धवसाहेब…”

पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती, असे शहरप्रमुख गजानन थरकुडे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 03, 2025 | 02:15 PM
पुण्यात ठाकरेंना धक्का; 'हे' नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; माजी नगरसेवक म्हणाले, "माझी शिवसेना, उद्धवसाहेब..."

पुण्यात ठाकरेंना धक्का; 'हे' नेते भाजपमध्ये प्रवेश करणार; माजी नगरसेवक म्हणाले, "माझी शिवसेना, उद्धवसाहेब..."

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे पाच माजी नगरसेवक हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. साेडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असलेल्या माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर खापर फाेडले आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने या पाचही जागा महापािलकेच्या निवडणुकीत आमच्या वाट्याला हव्यात, अशी मागणी केली आहे.

पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद बाहेर पडू लागली आहे. माजी पाच नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहे. यापार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनावडे यांनी सोशल मिडियावर पोस्ट करीत,  माझी शिवसेना , उद्धवसाहेब, आदित्यसाहेब यांच्याबद्दल मला खूप आदर आणि प्रेम आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही तक्रार नाही. परंतु पुण्यातील शिवसेनेला कोणीही वाली नाही. गेल्या पाच वर्षांत पक्ष वाढविण्यासाठी काही प्रयत्न केले गेले नाही. नगरसेवकांची संख्या वाढविण्यापेक्षा त्यांच्याच पायात पाय घालण्याचा प्रकार सुरु आहे. ज्यांचे खरे काम बॅक ऑफिस सांभाळणे आहे त्यांना पक्ष सांभाळायला दिला आहे. पक्षात मागील 5 वर्षात पक्ष वाढवण्यासाठी एकही बैठक झाली नाही की त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही, अशी टिका धनावडे यांनी केली आहे.

धनावडे यांनी केलेल्या टिकेला शहरप्रमुख गजानन थरकुडे यांनी प्रत्यु्त्तर दिलं आहे. थरकुडे म्हणाले, पक्ष सोडणाऱ्या माजी नगरसेवकांवर पक्षाने अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या होत्या. त्यांना निवडणूक समन्वयक पदाची जबाबदारी देखील देण्यात आली होती. मात्र त्यांनी निवडणुकीच्या संदर्भात किती बैठका घेतल्या तसेच शिवसेना वाढवण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले हे त्यांना विचारण्याची आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा: Pune Collector: पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसेंची बदली, आता ‘हे’ असणार नवे कलेक्टर

शिंदेंची शिवसेना झाली आक्रमक 

ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये जाणाऱ्या पाचही जागा या महायुतीच्या जागा वाटपात अामच्या पक्षाला मिळाव्यात अशी भुमिका शिंदेंच्या शिवसेनेने घेतली अाहे. यासंदर्भात शहर प्रमुख प्रमाेद ऊर्फ नाना भानगिरे यांनी पत्रकार परीषदेत भुमिका जाहीर केली. यामुळे पुढील काळात जागा वाटपात या जागा वादात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली अाहे. पत्रकार परीषदेला शिवसेनेचे शहर व जिल्हा संपर्क प्रमुख अजय भोसले यावेळी उपस्थित होते. तर भाजपकडून या प्रवेशाबाबत कोणतीही चर्चा अथवा माहिती दिली नसल्याचे ते म्हणाले.

‘त्या’ जागा आम्हीच लढविणार

भानगिरे म्हणाले की, राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून काम केले. गेल्या अडीच वर्षात माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात घेतलेल्या निर्णयामुळे पुन्हा एकदा महायुतीचे सरकार आले आहे. या दोन्ही निवडणूकांंमध्ये ज्यांचा विद्यमान खासदार, आमदार ती जागा त्या पक्षाची असे जागा वाटपाचे सूत्र होते. हेच सूत्र महापालिका निवडणूकांमध्येही कायम असणार आहे. त्यामुळे, २०१७ मध्ये तत्कालीन शिवसेनेने लढविलेल्या जागा आम्ही लढविणार आहोत. जे पाच नगरसेवक भाजपमध्ये जात आहेत त्या जागा ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर लढले होते. त्यामुळे या जागा शिवसेनेच्या असून या जागा आम्हीच लढविणार असल्याचा दावा भानगिरे यांनी केला आहे.

Web Title: Uddhav thackeray five former carporator join bjp at pune latest maharashtra and pune political marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 02:15 PM

Topics:  

  • BJP
  • Election News
  • Pune Politics
  • uddhav thackeray shivsena

संबंधित बातम्या

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल
1

‘तुझं माझं पटेना अन्…; गुहागरमध्ये भाजपा-शिवसेनेत प्रतिष्ठा पणाला, दोन्ही पक्षांकडून अर्ज दाखल

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं
2

Dharashiv Politics: ड्रग्ज प्रकरणातीला आरोपीला भाजपकडून नगराध्यक्षपदाची उमेदवारी; धाराशिवमध्ये राजकारण तापलं

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन
3

नगरपालिका आमच्या ताब्यात दया, एका वर्षातच…; गोपीचंद पडळकरांचं जतमधील जनतेला आश्वासन

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन
4

निवडणुका स्वबळावर लढण्याची कार्यकर्त्यांची भावना, सर्वच पक्षांनी…; हर्षवर्धन सपकाळांचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.