किरीट सोमय्या : आज भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची पत्रकार परिषद पार पडली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. किरीट सोमय्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंमुंबई पोलिसांनी याच्यावर प्राथमिक तपास सुरू केला. महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केलीत्री असताना दोन लाख स्क्वेअर फिटचा भूखंडावर रवींद्र वायकर यांना हॉटेल बांधायची परवानगी दिली. रवींद्र वायकर यांनी पालिकेची फसवणूक केली आहे. लहान मुलांच्या खेळाच्या मैदानावर ही हॉटेलची परवानगी देण्यात आली आहे. अकरा मार्च २०२३ रोजी मी तक्रार दिली होती. मुंबई पोलिसांनी याच्यावर प्राथमिक तपास सुरू केला. महापालिकेने दोन महिन्यापूर्वी वायकरांना दिलेली परवानगी रद्द केली असे किरीट सोमय्या म्हणाले.
पुढे ते म्हणाले, रवींद्र वायकर या विरोधात कोर्टात गेले होते. कोर्टाने स्पष्ट केलं आहे की, रवींद्र वायकर यांनी चीटिंग केली आणि खोटं बोलले. काल मी मुंबईचे जॉईंट कमिशनर यांची भेट घेतली आणि ताबडतोब रवींद्र वायकर यांच्या विरोधात एफआयआर दाखल करावा, याची मागणी केली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे देखील बोलणं केलं आहे. येत्या काही दिवसात उद्धव ठाकरे यांचे पार्टनर रवींद्र वायकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी कुठल्या परिस्थितीत २०२१ मध्ये परवानगी दिली याची देखील चौकशी व्हायला हवी. येत्या काही दिवसात पोलीस पाचशे कोटी हॉटेल घोटाळा प्रकरणात गुन्हा दाखल करणार आहेत असे किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं.
मुंबई महापालिकेने जेवढे रेमडेसिविर ऑर्डर दिले, त्या पैकी १००० इंजेक्शन हे उद्धव ठाकरे यांच्या जवळच्या घरात गेले. या संदर्भात मी ईडी, आर्थिक शाखा, इन्कम टॅक्स सर्वांकडे तक्रार केली आहे. त्यांच्याकडून तपासणीची सुरुवात झाली आहे. उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी नेते ज्याने १००० रेमडेसिविर चोरले, त्या प्रकरणाची वेगळी चौकशी करावी, अशी मागणी मी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. पेमेंट महानगरपालिकेने केला. डिलिव्हरी उद्धव ठाकरे यांच्या नेत्यांकडे झाली. या रेमडेसिविरच त्यांनी पुढे काय केलं? ब्लॅक मार्केटिंग केले का? काय केलं? याचा तपास होणार आहे असे किरीट सोमय्या यांनी सांगितले.