Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Ulhasnagar News :  उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामात अल्पवयीन मुलांना नाल्यात उतरवून कचरा आणि गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसविल्याचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 23, 2026 | 07:03 PM
उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Follow Us
Follow Us:
  • नालेसफाई की बालकांचा छळ?
  • अल्पवयीन मुलांना पोकलेनच्या बकेटमध्ये बसवून जीवघेणा स्टंट
  • कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी
उल्हासनगर महापालिकेच्या नालेसफाई कामातील एक धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, मोठ्या नाल्यात अल्पवयीन मुलांना उतरवून त्यांच्याकडून कचरा व गाळ काढण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. एवढ्यावरच न थांबता पोकलेन मशीनच्या बकेटवर मुलांना बसवून खेळविल्याचे व्हिडिओ समोर आल्याने बालसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकारामुळे महापालिका प्रशासन, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून दोषींवर तात्काळ निलंबन व फौजदारी कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

उल्हासनगर शहरात पावसाळ्यापूर्वी शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला असतानाच उल्हासनगर-१ येथील राजीव गांधी नगर परिसरातील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामात बालकामगारांचा वापर होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त, पोलीस उपायुक्त आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करून तातडीच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

Triple talaq: ‘राज्यात ट्रिपल तलाक प्रतिबंधक कायद्याची…’; गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे मोठे विधान

तक्रारीनुसार, प्रभाग क्रमांक ३ अंतर्गत सुरू असलेल्या नाल्याच्या साफसफाईचे काम एका खासगी कंत्राटदारामार्फत पोकलेन मशीनच्या सहाय्याने करण्यात येत आहे. मात्र कामादरम्यान अल्पवयीन मुलांना थेट नाल्यात उतरवून गाळ व कचरा पोकलेनच्या बकेटमध्ये भरून घेण्याचे काम करून घेतले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. या प्रकाराचा व्हिडिओ पुरावा देखील उपलब्ध असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

याशिवाय पोकलेन चालकाकडून मुलांना मशीनच्या बकेटवर बसवून गोलाकार फिरविले जात असल्याचे दृश्य व्हिडिओमध्ये दिसत असल्याने या मुलांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. संबंधित प्रकार हा बाल व किशोर कामगार (प्रतिबंध व नियमन) अधिनियम, किशोर न्याय अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील विविध तरतुदींचे उल्लंघन करणारा असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित कंत्राटदार, पोकलेन चालक तसेच नालेसफाई कामाशी निगडित जबाबदार अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशी सुरू करावी, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रशासनाकडून योग्य ती कारवाई न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे या गंभीर आरोपांवर महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे आता शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

मुंबई भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे चहाप्रेमी शहर; बदलत्या ट्रेंड्समुळे पीच टी, कोम्बुचा आणि वेलनेस टीची वाढती क्रेझ

Web Title: Ulhasnagar drain cleaning minor children used as labour serious allegations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Ulhasnagar
  • viral video

संबंधित बातम्या

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल
1

Monsoon Health News : पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका वाढला! उल्हासनगरच्या रुग्णालयात एका दिवसात आठ जण दाखल

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’!  राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप
2

Kolhapur Viral Video: कोल्हापुरात रवीकिरण इंगवलेंचा ‘व्हिडिओ बॉम्ब’! राजेश क्षीरसागरांवर ४० लाखांच्या टक्केवारीचा गंभीर आरोप

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा
3

‘सावित्रीबाई जोतीराव फुले’ मालिकेत झळकणार शिरूरची अनघा शिंदे; शिरूरच्या शिरपेचात मानाचा तुरा

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला
4

Satara News : लग्नाची सनई वाजण्याआधीच पोलिसांचा सायरन! रहीमतपूरमध्ये १५ वर्षीय मुलीचा बालविवाह रोखला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.