Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Palghar News: 170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोटी उड्डाणपुलाजवळ चांदी घेऊन जाणाऱ्या खासगी व्हॅनचा भीषण अपघात झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने व्हॅन दुभाजक ओलांडून ट्रेलरवर आदळली.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 15, 2026 | 12:15 PM
170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

170000000 रुपयांची चांदी घेऊन जाणाऱ्या व्हॅनचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावरील घटना

Follow Us
Follow Us:
  • मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण दुर्घटना
  • चांदीने भरलेली व्हॅन ट्रकवर आदळली
  • चारोटी उड्डाणपुलावर अपघात
  • 600 किलो चांदी सुरक्षित ताब्यात
Mumbai Ahmedabad Highway Accident : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज (15 मे 2026) पहाटे एका खासगी कंपनीच्या व्हॅनचा भीषण अपघात झाला. पालघरमधील चारोटी उड्डाणपुलावर चालकाचे व्हॅनवरील नियंत्रण सुटले, व्हॅन डिव्हायडर ओलांडून समोरून येणाऱ्या ट्रकला धडकली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमी व्यक्तीवर कासा उप-जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, ही व्हॅन मुंबईतील एका सराफा कंपनीकडून वापी येथील कंपनीकडे अंदाजे ६०० किलोग्रॅम चांदी घेऊन जात होती. या चांदीच्या विटांची किंमत अंदाजे १७६.६ दशलक्ष रुपये असल्याचा अंदाज आहे. पहाटे सुमारे ६:१५ वाजता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि व्हॅन डिव्हायडर ओलांडून गुजरातहून मुंबईकडे जाणाऱ्या एका ट्रेलरला धडकली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस आणि कासा पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. या अपघातात वाहन चालकासह सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती.

St Bus News : एसटीसमोरील आर्थिक संकट गडद! राजस्थानप्रमाणे करसवलत द्या; डिझेल दरवाढीवरून एसटी कर्मचारी काँग्रेसची मागणी

व्हॅनमध्ये मोठ्या प्रमाणात चांदी आणि सुरक्षा रक्षकाचे शस्त्र असल्याने पोलिसांनी तात्काळ सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या. कासा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते आणि त्यांनी संपूर्ण माल ताब्यात घेतला. मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी, एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाच्या देखरेखीखाली क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहन हटवण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, महामार्गावरील वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.

कोणत्या कंपनीच्या मालकीची ही चांदी?

मुंबईतील नाकोडा बुलियन कंपनीकडून वापी जीआयडीसी येथील मोदी सन्स लिमिटेडकडे ही चांदी नेली जात होती. चांदीची वाहतूक करणाऱ्या या व्हॅनचा पालघर तालुक्यात अपघात झाला. या अपघातात वाहन चालक किरकोळ जखमी झाला आहे.

दरम्यान,दरम्यान, चांदीच्या दरात मोठी वाढ होत 13 मे रोजी प्रति किलो दर ₹2,95,805 वर पोहोचला होता. त्यानंतर प्रॉफिट बुकिंगमुळे 14 मे रोजी दरात 2 ते 3 हजार रुपयांची घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे.

Mumbai News : भाभा रुग्णालयात प्रसूतीनंतर महिलेचा वेदनेतून मृत्यू; डॉक्टरांनी दुर्लक्ष केल्याचा नातेवाईकांचा आरोप

Web Title: Van carrying silver bricks overturns accident incident on the charoti flyover in palghar news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Accident
  • Palghar news
  • silver

संबंधित बातम्या

Palghar News: चिखलेत समुद्रधूपचा वाढता धोका कायम! नवीखाडी, वडकतीपाडातील किनारा ढासळल्याने उद्भवली स्थिती
1

Palghar News: चिखलेत समुद्रधूपचा वाढता धोका कायम! नवीखाडी, वडकतीपाडातील किनारा ढासळल्याने उद्भवली स्थिती

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह
2

Vasai Virar News : हॉटेल-डेअरींवर कारवाई, मग खाऊगल्ल्यांना मोकळे रान का? FDA च्या दुटप्पी भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी
3

Ratnagiri Accident: दोन एसटी बस समोरासमोर धडकल्या, मागून कारही आदळली; रत्नागिरी-पावस मार्गावर विचित्र अपघात, २२ प्रवासी जखमी

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?
4

Palghar News : तीन बड्या उद्योगांवर कारवाईचा फास, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नोटीसा; प्रदूषण नियंत्रणात त्रुटीची कारणं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.