Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब थोरातांच्या कार्यालयावर ‘वंचित’चा मोर्चा; मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर मोर्चा घेऊन जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले.

  • By नारायण परब
Updated On: Sep 21, 2024 | 05:35 PM
आदिवासी समाजाचा मोर्चा पेणमध्ये धडकणार; 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी समाज आक्रमक

आदिवासी समाजाचा मोर्चा पेणमध्ये धडकणार; 'त्या' मुलीच्या मृत्यूप्रकरणी समाज आक्रमक

Follow Us
Close
Follow Us:

काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी प्रदेशात जात आरक्षण विरोधी व्यक्तव्य केल्याच्या निषेधार्थ संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते  आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयावर मोर्चा काढला. या मोर्चासाठी जात असताना पोलिसांनी हा मोर्चा शासकीय विश्रामगृहाजवळ अडवत सर्व मोर्चेकरांना स्थानबद्ध केले.

राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांच्यामार्गदर्शनाखाली सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते शासकीय विश्रामगृहावर एकत्र आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाला प्रारंभ झाला. यावेळी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते अन आरक्षणाला विरोध करणारे राहुल गांधी यांच्या विरोधात मोर्चेकरांनी जोरदार घोषणाबाजी केली.हा मोर्चा बस स्थानक मार्गे नाशिक रोडने काँग्रेस नेते आ बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयवरती जात असताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस निरीक्षक रवींद्र चव्हाण यांनी हा मोर्चा शासकीय विश्राम गृहाच्या जवळ अडविला.

आंदोलनकर्ते अन पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी

हा मोर्चा नाशिक रोड ने घोषणाबाजी करत आ. थोरात यांच्या संपर्क कार्यालयाकडे निघाला. मात्र पुन्हा हा मोर्चा पोलीस प्रशासनाने बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या शिवाजीनगरच्या कोपऱ्यावरती अडवित पुढे नेण्यास मज्जाव केला. त्यामुळे आंदोलनकर्ते अन पोलिसांमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. त्यामुळे मोर्चेकर जास्तच आक्रमक झाले होते. त्या नंतर हा मोर्चा आटोक्यात येत नाही म्हणून सर्व मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी स्थानबद्ध केले.

भाजपच्या पोटात तेच राहुल गांधींच्या ओठावर!

लोकसभा निवडणुकीच्या अगोदर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढत भाजप संविधान मोडायला लागले आहे ते संविधान आम्ही वाचवायला आलो आहे अशी साद घालत एसी एसटी एनटी ओबीसी यांची मते घेतली. त्यानंतर विरोधी पक्ष नेते झाल्यानंतर अवघ्या तीनच महिन्यात हेच राहुल गांधी परदेशात जाऊन ही विषमता नष्ट झाल्यावर आम्ही आरक्षण बंद करू असे विरोधी वक्तव्य करतात. तर आम्ही संविधान बदलणार आम्ही आरक्षण बदलणार असे भाजप उघडपणे सांगत आहे. मात्र काँग्रेस छुप्या पद्धतीने भाजपचाच अजेंडा वापरून आरक्षणाला विरोध करत आहे. त्यांच्या पोटात होतं ते राहुल गांधी यांच्या तोंडातून ते बाहेर पडले आहे.

Web Title: Vanchit bahujan aghadi protest on balasaheb thorat office cops arrested protestors

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2024 | 05:35 PM

Topics:  

  • Congress
  • Rahul Gandhi
  • Vanchit Bahujan Aghadi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका
1

Rahul Gandhi on Central Govt: ‘पंतप्रधान मोदी गरिबांना उपाशी पाहू इच्छितात…’, मनरेगा चौपाल येथे राहुल गांधींची केंद्रावर टीका

काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत केली आघाडी
2

काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी घेतला मोठा निर्णय; ‘या’ पक्षासोबत केली आघाडी

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…
3

Chiplun News: जिल्हा परिषद अन् पंचायत समितीसाठी काँग्रेसची भूमिका गुलदस्त्यात; तर राष्ट्रवादी…

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा
4

Rahul Gandhi: “भाजप आणि आरएसएस सत्तेचे केंद्रीकरण करतात…”, राहुल गांधींचा सरकारवर निशाणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.