Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

राज्यातील चार आयएएस अधिकारी जमीन व्यवहारात फुटपट्टीने मोजून पैसे वसूल करतात, कारवाई नाही केली तर विधानसभेत हे प्रकरण मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 24, 2026 | 04:04 PM
सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

सरकारमध्ये भ्रष्टाचाराचा कळस, चार आयएएस अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराचे प्रकरण उघड करणार; नाना पटोलेंचा इशारा

Follow Us
Follow Us:

मुंबई : भारतीय जनता पक्ष हा खोटारडा असून महिलांबाबतचा त्यांचा कळवळा बेगडी आहे. खोटं बोल पण रेटून बोल, ही त्यांची पद्धत आहे. २०२३ सालीच महिला आरक्षण विधेयक संसदेत सर्व पक्षांच्या पाठिंब्याने पास झालेले आहे, त्याची अंमलबजावणी भाजपा करत नाही तर १६ एप्रिलला जे विधेयक लोकसभेत सादर केले होते ते देश तोडणारे होते, त्यामुळे भाजपाचा बेबनाव उघड झाला आहे, असे काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी म्हटले आहे.

नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, महिला आरक्षणचा कायदा झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये स्वतःचा मोठा सत्कार करून घेतला होता, आता मात्र ते विरोधी पक्षांना महिला विरोधी ठरवत आहेत, हा त्यांचा दुटप्पीपणा आहे. भाजपाला सत्तेचा माज आला आहे, हे वरळीतील मोर्चात दिसून आले, मोर्चामुळे वाहतूक कोंडी झाल्याने एका महिलेने संताप व्यक्त केला तो योग्यच होता, त्या महिलेने भाजपाला त्यांची जागा दाखवून दिली आहे. लोकांना भाजपाचा खरा चेहरा कळलेला आहे, असेही नाना पटोले म्हणाले..

प्रशासनातील भ्रष्टाचार उघड करणार

भाजपा युती सरकारमध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात बोकाळला आहे. सरकारमध्ये काही आलबेल नाही, तीन तिघाडा काम बिघाडा आहे, मंत्र्यांमध्येच मलई खाण्याची स्पर्धा लागलेली नाही तर प्रशासनातील वरिष्ठ आयएएस अधिकारीही भ्रष्टाचारात आकंठ बुडले आहेत. राज्यातील चार आयएएस अधिकारी जमीन व्यवहारात फुटपट्टीने मोजून पैसे वसूल करतात, त्यांची फाईल मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांकडे पाठवणार आहे, त्यांनी कारवाई नाही केली तर विधानसभेत हे प्रकरण मांडू, असा इशारा नाना पटोले यांनी दिला आहे.

मराठीसाठी जबरदस्ती कशाला ?

मुंबईतील रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकावे अन्यथा त्यांचे परवाने रद्द करू असे फर्मान सरकारने काढले आहे त्यावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, धर्म, जात व भाषेच्या नावावर फूट पाडणे चुकीचे आहे. ज्याला शिकायचे आहे ते शिकतील पण जबरदस्ती करायचे काय कारण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात येतात तेव्हा त्यांनाही मराठीतच भाषण करायला सांगणार का? असा प्रश्न विचारून हे महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. सर्व जाती, धर्म व भाषेचा सन्मान केला पाहिजे ही शिकवण आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली आहे. द्वेष करण्याचे पाप सरकार करत आहेत, त्यांना जनता माफ करणार नाही असेही नाना पटोले म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पिंपरी-चिंचवडमध्ये अनधिकृत जाहिरात फलकांवर ‘हातोडा’; महापालिकेची धडक कारवाई

भारताला ‘नरक’ म्हटले तरीही मोदी गप्पच का?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेसमोर भारत गहाण ठेवला आहे. डोनाल्ड ट्रम्प भारताला नरक म्हणतात आणि तरिही आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच बोलत नाहीत. भारत देश स्वर्ग आहे असे आपले साधू संत सांगतात मग डोनाल्ड ट्रम्प नरक म्हणतात, त्यावेळी राग आला पाहिजे मोदी गप्प बसले आहेत पण सरसंघचालक मोहन भागवत का गप्प बसले आहेत. नरेंद्र मोदी ट्रम्पला सरंडर झाले आहेत हे पुन्हा पुन्हा दिसत आहे, यांच्या पापाचा घडा आता भरला आहे, असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Congress leader nana patole has criticized the mahayuti government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • congress nana patole
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल
1

IIT Bombay Sahil Wakode Case : साहिल वाकोडे प्रकरणात नवा ट्विस्ट; CCTV आला समोर, वर्षा गायकवाडांनी उपस्थित केले गंभीर सवाल

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी
2

साहिल वाकोडे आत्महत्या प्रकरणावरुन युवक काँग्रेस आक्रमक; दोषींवर कठोर कारवाईची मागणी

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.