Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत मोरे आज ‘मशाल’ हाती घेणार; जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईला रवाना

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी पुण्याहून मुंबईला जाताना वसंत मोरेंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 09, 2024 | 01:07 PM
वसंत मोरे आज ‘मशाल’ हाती घेणार; जोरदार शक्तीप्रदर्शन करत मुंबईला रवाना
Follow Us
Follow Us:

पुणे : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच राजकीय पक्षात इनकमिंग आऊटगोईंग सुरु आहे. राज्यातील लोकसभा निवडणुकीत पराभव झालेले वंचित आघाडीतील पुण्याचे दिग्गज नेते वसंत मोरे हे आज ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत वसंत मोरे पक्षप्रवेश करणार आहेत. यावेळी पुण्याहून मुंबईला जाताना वसंत मोरेंकडून मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात येत आहे. गाड्यांचा मोठा ताफा, हातात भगवे झेंडे घेत वसंत मोरे मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत.

वसंत मोरे यांनी पुणे लोकसभेची निवडणूक वंचित बहुजन आघाडीच्या तिकीटावर लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर वसंत मोरे यांनी ठाकरे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आज वसंत मोरे हे ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत. मागील आठवड्यात त्यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्याचवेळी आपण पक्षात पक्ष प्रवेश करू इच्छितो, असे त्यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितले होते.

वसंत मोरे काय म्हणाले ?

माझं हे शक्तीप्रदर्शन पहिल्यांदा नाही. माझ्या मागे जनतेची शक्ती आहे ती शक्ती सातत्याने माझ्या पाठीमागे असते. आज जवळपास मनसेचे १७ शाखाअध्यक्ष, ५ उपविभाग अध्यक्ष, १ शहराध्यक्ष, पर्यावरण सेनेचे अनेक पदाधिकारी, वाहतूक सेनेचे पदाधिकारी, माथाडीचे पदाधिकारी बऱ्यापैकी आज माझ्यासोबत सर्वचजण प्रवेश करत आहेत, असे वसंत मोरे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी यापैकी कोणालाही जबरदस्ती केलेली नाही. अगदी पहिल्या दिवसापासून मी प्रत्येकाला सांगतोय की ज्यांना पक्षात राहायचं ते राहू शकतात. परंतू पक्षात जे राजकारण सुरु होतं, हे या सर्व पदाधिकाऱ्यांनी डोळ्यांनी पाहिलं आहे. त्यामुळे कोणालाही जबरदस्ती न करता मी या सर्व पदाधिकाऱ्यांसह पक्षात प्रवेश करत आहे, असेही वसंत मोरेंनी म्हटले.

Web Title: Vasant more will join thackerays shiv sena today nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai
  • shivsena
  • Uddhav Thackeray
  • Vasant more

संबंधित बातम्या

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या
1

स्विफ्ट कारमध्ये गावठी पिस्तूल अन् तीन जिवंत काडतुसे; बारामती पोलिसांनी तरुणाला ठोकल्या बेड्या

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!
2

Pradeep Purnekar Case : ‘१३ CCTV फुटेज दिले, तरी अटक नाही’, राम पूर्णेकर संतापले, आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटणार!

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
3

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते
4

Mumbai Mayor Cup: बुद्धिबळाच्या पटावर युवा खेळाडूंचा जलवा! अर्जुन कुलकर्णी, अहान काटरुका गटविजेते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.