Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 3 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vedant Bandgar Murder Case : आरोपींना मकोका लावणार, कुणाचीही गय नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

वेदांत बंडगर हत्या प्रकरणातील आरोपींवर मकोका लावण्याची प्रक्रिया सुरू असून कुणाचीही गय केली जाणार नाही, असा इशारा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. मुख्य आरोपींसह दोघांना अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

  • By विवेक
Updated On: Jun 16, 2026 | 08:39 PM
Vedant Bandgar Murder Case : आरोपींना मकोका लावणार, कुणाचीही गय नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Vedant Bandgar Murder Case : आरोपींना मकोका लावणार, कुणाचीही गय नाही; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा इशारा

Follow Us
Follow Us:

निष्पाप वेदांत बंडगरच्या हत्येची घटना गंभीर, दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. वेदांतच्या कुटुंबियांच्या दुःखात मी आणि राज्य शासन सहभागी आहोत. या प्रकरणात पीडितांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री म्हणून पोलीस दल आणि प्रशासनाला कडक सूचना केल्या असून या गुन्ह्यात कुणाचीही गय केली जाणार नाही किंवा हस्तक्षेप वा दबाव खपवून घेतला जाणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

याबाबत पालकमंत्री कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे कि, आपण या प्रकरणाची माहिती घेतली असून घटना घडल्यापासून तपाससंदर्भातील हालचालींवर वेळोवेळी आपले बारकाईने लक्ष आहे. या दुर्दैवी घटनेबाबत मी व राज्य शासन अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकरणातील प्रत्येक दोषी व्यक्तिला कायद्यापुढे उभे करण्यासाठी पोलीस यंत्रणेने पूर्ण क्षमतेने काम करण्याच्या सूचना दिल्या असून, पीडिताच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

पत्रकात म्हटले आहे कि, पोलिसांनी तपासात गती घेतली असून, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी निलेश गडदे व त्याचा साथीदार अतुल वायदंडे यांना अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्यांना १८ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. फिर्यादीत नमूद असलेल्या अन्य तीन आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला एकही आरोपी सुटणार नाही, ही शासनाची स्पष्ट भूमिका आहे. तपासातून उपलब्ध झालेल्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्यासाठी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) चे कलम लागू करण्याची कार्यवाही सुरू आहे.

APMC Police Action : एपीएमसी पोलिसांची धडक कारवाई; वेश्याव्यवसायाविरोधात मोहीम, अतिक्रमणावरही संयुक्त कारवाई

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. फिर्यादीत नमूद इतर ३ आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर जत पोलीस ठाण्यात यापूर्वी दाखल झालेल्या गुन्ह्याचीही गंभीर दखल घेण्यात आली आहे. संबंधित पोलीस निरीक्षकांचा प्राथमिक चौकशी अहवाल कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक यांच्याकडे सादर करण्यात आला असून संबंधित पोलीस निरीक्षक यांना नियंत्रण कक्षास संलग्न करण्यात आले आहे.

या प्रकरणात कोणालाही अभय दिले जाणार नाही, कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि कोणताही दोषी सुटणार नाही. तसेच कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. तपासात समोर येणारा कोणताही व्यक्ती कितीही प्रभावशाली अथवा कोणत्याही स्तरावरील असला तरी त्याला कायद्याच्या चौकटीत आणले जाईल. निष्पक्ष, पारदर्शक आणि वेगवान तपासाद्वारे पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शस्त्रे, काडतुसे आणि ड्रग्ज… देशाच्या राजधानीत मोठी खळबळ; पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या!

Web Title: Vedant bandgar murder case mcoca action chandrakant patil warning accused

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 08:39 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • kolhapur
  • Kolhapur Crime

संबंधित बातम्या

‘देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न’, चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव
1

‘देवेंद्र फडणवीसांकडे दैवी शक्ती, ते सर्वगुणसंपन्न’, चंद्रकांत पाटील यांच्याकडून मुख्यमंत्र्यांवर कौतुकांचा वर्षाव

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..
2

kolhapur Crime: पंढरपूर दर्शनाच्या बहाण्याने गोठ्यात नेलं, माजी सरपंचेची गळा आवळून हत्या; मृतदेह समुद्रात फेकण्याचा कट, मात्र..

Kolhapur Madhuri Elephant : लाडक्या ‘माधुरी’ हत्तीणीला आणण्यासाठी कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक!
3

Kolhapur Madhuri Elephant : लाडक्या ‘माधुरी’ हत्तीणीला आणण्यासाठी कोल्हापुरात ग्रामस्थ आक्रमक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.