पाकिस्तानातून सुत्रे हलवणाऱ्या ७ जणांना ठोकल्या बेड्या (Photo Credit- X)
या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपींकडून पाच पिस्तूल, ४१ जिवंत काडतुसे, सात मोबाईल फोन आणि एक स्कॉर्पिओ गाडी जप्त केली. विशेष पथकाने सांगितले की, ही टोळी तरुणांना आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी सोशल मीडियाचा वापर करत असे; त्यांना झटपट पैसा आणि गुन्हेगारी विश्वातील ग्लॅमरचे आमिष दाखवून भरती केले जात असे. एकदा भरती झाल्यानंतर, त्यांना शस्त्रे आणि अमली पदार्थांच्या तस्करीसारख्या कामांमध्ये गुंतवले जात असे.
Delhi Police Special Cell has busted a Pakistan-backed terror-crime syndicate allegedly operated by gangster-turned-terrorist Shahzad Bhatti and his associate Ajmal Gujjar, arresting seven key operatives involved in the smuggling of illegal arms, ammunition and narcotic… pic.twitter.com/418BrZ3YIR — ANI (@ANI) June 16, 2026
मे २०२६ मध्ये पोलिसांना माहिती मिळाली की, शहजाद भट्टी आणि अजमल गुज्जर दिल्ली-एनसीआरमध्ये मोठे गुन्हेगारी आणि दहशतवादी कृत्य करण्याचा कट रचत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी ‘योगी’ ऊर्फ मोहित याला अटक केली. त्याच्याकडून बेकायदेशीर शस्त्रे तसेच पाकिस्तानातील सूत्रधारांशी (हँडलर्स) त्याचा संपर्क असल्याचे पुरावे हस्तगत करण्यात आले.
चौकशीदरम्यान असे निष्पन्न झाले की, टोळीचे सदस्य दिल्ली, गाझियाबाद आणि आसपासच्या परिसरातील अनेक संवेदनशील व महत्त्वपूर्ण ठिकाणांची रेकी (पाहणी) करत होते. या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडिओ पाकिस्तानातील त्यांच्या सूत्रधारांना पाठवले जात होते. पोलिसांनी सांगितले की, वेळीच केलेल्या कारवाईमुळे संभाव्य दहशतवादी कट उधळून लावण्यात यश आले. तपासात हे देखील समोर आले की, पाकिस्तानमधून ड्रोनद्वारे पाठवलेली शस्त्रे आणि अमली पदार्थांची खेप पंजाबमधून गोळा करून ती दिल्ली-एनसीआरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी या आरोपींवर होती.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या नेटवर्कशी संबंधित अनेक व्यक्तींवर यापूर्वीच खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा आणि ‘आर्म्स ॲक्ट’ (शस्त्र कायदा) व ‘एनडीपीएस ॲक्ट’ (अमली पदार्थ विरोधी कायदा) अंतर्गत गुन्हे दाखल आहेत. दिल्ली पोलीस आता या नेटवर्कशी संबंधित फरार आरोपी, शस्त्र पुरवठादार आणि आर्थिक रसद पुरवणाऱ्यांचा (फायनान्सर्स) शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की तपास सुरू असून, आगामी काळात या नेटवर्कबाबत आणखी महत्त्वपूर्ण खुलासे होऊ शकतात.
Crime News : टोळक्याकडून तलवारीने अन् लोखंडी रॉडने तरुणावर हल्ला; कारण काय तर…






