Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 15 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kumbh Mela 2026: ‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

वाई येथे कृष्णा नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यावर विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र आक्षेप घेत संयोजकांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 22, 2026 | 04:19 PM
‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

‘धार्मिक की राजकीय अजेंडा?’ कृष्णा नदीकाठी लघु कुंभमेळ्याला विरोध; प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Follow Us
Follow Us:
  • कृष्णा नदीचा उल्लेख नसताना वाईत लघु कुंभमेळा कशासाठी?
  • विद्रोही सांस्कृतिक चळवळीची मागणी
  • प्रदूषण आणि कोट्यवधींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
सातारा : ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई (सातारा जिल्हा) येथील कृष्णा नदीकाठी पाच दिवसांच्या लघुकुंभमेळ्याला (Wai Laghu Kumbh Mela) सुरुवात झाली आहे。या भव्य धार्मिक व भक्तीमय सोहळ्यात साधू-संत आणि महंतांच्या उपस्थितीत नदी घाटांवर विविध धार्मिक विधी पार पडत आहेत. याचदरम्यान, वाई येथे कृष्णा नदीकाठी आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्याबाबत विद्रोही सांस्कृतिक चळवळीने तीव्र आक्षेप नोंदवत संयोजकांनी यामागील भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे. कृष्णा नदी पवित्र मानली जात असताना पारंपरिक सप्तगंगा मंत्रामध्ये तिचा उल्लेख नसल्याचा मुद्दा उपस्थित करत या मेळ्याच्या आयोजनामागे धार्मिक आणि राजकीय हेतू असल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अध्यक्ष कॉ. धनाजी गुरव, सरचिटणीस डॉ. जालिंदर घिगे, प्रवक्ते कॉ. अविनाश कदम व विजय मांडके यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, वाई ही धर्मसुधारकांची परंपरा असलेली भूमी असून येथे बाहेरून येऊन कर्मकांडांचा प्रचार करणे योग्य नाही. लघु कुंभमेळ्यामुळे कृष्णा नदीचे प्रदूषण होणार नाही याची खात्री संयोजकांनी द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे.

Satara News: तरुणांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप; साताऱ्यात युथ पॅंथरचे अनोखे निदर्शने

या मेळ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च होणार असल्याचा दावा करत संघटनेने त्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महाप्रसाद, साधुसंतांची व्यवस्था, निवास, दक्षिणा, मिरवणुका, सोशल मीडिया प्रचार आदींसाठी होणारा खर्च वाया जाणारा असून त्यातून बेरोजगारी किंवा विकासाचे कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

लघु कुंभमेळ्याच्या काळात वाईतील मंडई व मासेविक्री बंद राहणार असल्याने शेतकरी व व्यावसायिकांचे नुकसान होणार असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जागतिक मंदी, इंधन व गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर अशा धार्मिक आयोजनांवर होणारा मोठा खर्च टाळावा, अशी मागणी विद्रोही सांस्कृतिक चळवळीने केली आहे.

कुंभमेळ्यादरम्यान २१ मे रोजी भूमिपूजन व छावणी प्रवेश, २२ मे रोजी धर्मध्वजा आरोहण, २३ मे रोजी विष्णूयाग व सार्वजनिक हवन, २४ मे रोजी हिंदू महासभा व दीप प्रज्वलन, तर २५ मे रोजी नागा संन्यासींचे पावन स्नान, भव्य रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.

या सोहळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांच्यासह विविध पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीत पुरेसे पाणी सोडण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

पालिका रुग्णालयांच्या रक्तपेढ्या खासगीकरणाच्या मार्गावर? वाढत्या दरांच्या भीतीने विरोधक आक्रमक

Web Title: Vidrohi cultural movement objection mini kumbh mela wai krishna river

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • maharashtra
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन, ‘हरित संकल्प’ पूर्णत्वास; १०० विविध जातींच्या वृक्षांनी बहरणार आगार परिसर
1

वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन, ‘हरित संकल्प’ पूर्णत्वास; १०० विविध जातींच्या वृक्षांनी बहरणार आगार परिसर

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प
2

Satara News : स्थायी समितीत गदारोळ; वादानंतर खासदार समर्थक नगरसेवकांचा वॉकआऊट, तासभर कामकाज ठप्प

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?
3

ST Bus Fare Hike : एसटी प्रवाशांना झटका! 10% हंगामी भाडेवाढीला 31 जुलैपर्यंत मुदतवाढ, तिकीट किती रुपयांनी महागणार?

विकासकामांचा शून्य पत्ता अन् करवसुलीचा सपाटा! वाईत जनतेला वेठीस धरण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट विरोधकांनी पाडला हाणून
4

विकासकामांचा शून्य पत्ता अन् करवसुलीचा सपाटा! वाईत जनतेला वेठीस धरण्याचा सत्ताधाऱ्यांचा घाट विरोधकांनी पाडला हाणून

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.