Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन, ‘हरित संकल्प’ पूर्णत्वास; १०० विविध जातींच्या वृक्षांनी बहरणार आगार परिसर

Tree Plantation MSRTC Wai Depot: वाई एसटी आगाराच्या ७८ व्या वर्धापन दिनानिमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत १०० विविध जातींच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. वड, पिंपळ, कडुनिंब, फळझाडे आणि औषधी वनस्पतींच्या लागवडीमुळे आगार भविष्यात हिरवाईने नटलेले ‘वनराई उद्यान’ म्हणून विकसित होण्याची अपेक्षा आहे

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jul 15, 2026 | 08:41 PM
वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन, ‘हरित संकल्प’ पूर्णत्वास; १०० विविध जातींच्या वृक्षांनी बहरणार आगार परिसर
Follow Us
Follow Us:
  • वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन
  • ‘हरित संकल्प’ पूर्णत्वास
  • १०० विविध जातींच्या वृक्षांनी बहरणार आगार परिसर

वाई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाई एसटी आगाराचा ७८ वा वर्धापन दिन यंदा अत्यंत स्तुत्य आणि पर्यावरणपूरक उपक्रमाने साजरा करण्यात आला. ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे’ या उक्तीनुसार, आगाराच्या मोकळ्या जागेत १०० वेगवेगळ्या जातींच्या वृक्षांची लागवड करून आगाराने निसर्ग संवर्धनाचा नवा पायंडा पाडला आहे.

राज्य सरकारचा मोठा निर्णय! २२ जुलै रोजी अजितदादांची जयंती शासकीय स्तरावर साजरी होणार; सामान्य प्रशासन विभागाचे परिपत्रक जारी

या वृक्षारोपण मोहिमेत केवळ शोभेची झाडेच नव्हे, तर पर्यावरण समतोल राखणाऱ्या विविध प्रकारच्या रोपांची निवड करण्यात आली होती. यामध्ये प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब, सोनचाफा, बकुळ, कांचन, सीताफळ, जांभूळ, फणस, आंबा, बकुळ आणि अनेक औषधी वनस्पतींचा समावेश आहे. या विविधतेमुळे येत्या काही वर्षांत वाई एसटी आगार एक लहानसे ‘वनराई उद्यान’ म्हणून ओळखले जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

या विशेष कार्यक्रमासाठी सामाजिक वनीकरण विभागाचे वनपाल दौलत भोसले आणि वनरक्षक हर्षदा हांडे यांनी उपस्थित राहून वृक्षारोपणासाठी तांत्रिक मार्गदर्शन केले. वाईच्या आगार व्यवस्थापिका श्रीमती रेश्मा गाडेकर यांच्या पुढाकाराने आणि स्थानक प्रमुख निलेश माने, तसेच लेखाकार यांच्या विशेष सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला. या प्रसंगी बोपर्डी गावचे सरपंच शंकर शिवराम गाढवे यांनी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहून या उपक्रमाचे कौतुक केले.

निसर्ग रक्षणाची सामूहिक शपथ

कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना आगार व्यवस्थापिका रेश्मा गाडेकर म्हणाल्या की, “७८ वर्षे पूर्ण करणाऱ्या एसटी महामंडळाचा प्रवास आता समाज आणि पर्यावरणाप्रती जबाबदारी वाढवणारा आहे. १०० प्रकारची झाडे लावून आम्ही केवळ परिसर सुशोभित करत नाही, तर भविष्यातील पिढीसाठी ऑक्सिजनची बँक तयार करत आहोत.”

या मोहिमेत वाई आगारातील एसटी चालक, वाहक, कार्यशाळेतील कुशल तंत्रज्ञ आणि सर्व कर्मचारी वर्गाने उत्साहाने सहभाग घेतला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी फक्त झाडे लावली नाहीत, तर त्यातील प्रत्येकाने एका झाडाच्या संगोपनाची जबाबदारी (दत्तक) स्वतःहून स्वीकारली आहे. पर्यवेक्षकीय कर्मचारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाने प्रवाशांचेही लक्ष वेधून घेतले. एकंदरीतच, वाई एसटी आगाराने ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून घेतलेला हा ‘हरित उपक्रम’ संपूर्ण जिल्ह्यासाठी एक प्रेरणादायी आदर्श ठरला आहे.

विठूनामाचा गजर अन्…! सोमेश्वरनगर येथे संत सोपानकाका पालखीचे पहिले गोल अश्वरिंगण उत्साहात संपन्न; दीड लाख वारकऱ्यांची उपस्थिती

Web Title: Msrtc wai depot tree plantation 78th anniversary green initiative

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 08:41 PM

Topics:  

  • Bus Stand
  • Tree
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद
1

१ kv सोलर रूफटॉप योजनेला पसरणीतून सुरुवात; ‘लाईट बिलमुक्त गाव’ मोहिमेला मिळतोय प्रतिसाद

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू
2

Satara News : बावधन परिसरात खाणपट्ट्याविरोधात आमरण उपोषण सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.