मुंबई – विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Manson session) १७ ऑगस्टपासून सुरु झाले आहे. हा अंतिम आठवडा आहे. ४ ऑगस्टला पावसाळी अधिवेशन संपणार आहे. दरम्यान, अधिवेशन संपत आले तरी, विधानसभेचा विरोधी पक्षनेता कोण हे ठरत नव्हते. मात्र अखेर आता काँग्रेसमधून विरोधी पक्षनेत्याचे नाव जाहिर झाले आहे. अखेर विधानसभेला विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विजय वडेट्टीवार यांची नवे विरोधी पक्षनेते म्हणून निवड करण्यात आली आहे. विधीमंडळ पक्षनेते म्हणून बाळासाहेब थोरात यांनी निवड करण्यात आलेली आहे. अखेर काँग्रेसने विजय वडेट्टीवार यांच्या नावावर शिक्कामोर्तं केले आहे. पावसाळी अधिवेशन सुरु झाल्यापासून विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (vijay vadettiwar is the new leader of opposition in the legislative assembly the assembly finally got a leader of the opposition)
Congress Leader Vijay Wadettiwar to be named as LOP in Maharashtra assembly, Congress High Command has conveyed to CLP Leader Balasaheb Thorat that Wadettiwar’s name be proposed for LOP post: Maharashtra Congress (File pic) pic.twitter.com/HUSqPcxFW6 — ANI (@ANI) August 1, 2023
पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण व थोरातांची होती चर्चा
दरम्यान, पावसाळी अधिवेशन संपत आले तरी, विरोधी पक्षनेत्यांची मविआत निवड होत नाही, यावरुन सत्ताधाऱ्यांनी टिका केली होती. यावरुन मविआत समन्वय नसल्याचे दिसून आले होते. मात्र आता विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विधान सभेच्या विरोधी पक्ष नेत्यासाठी पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या तीन बड्या नेत्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र आता विजय वडेट्टीवार यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळं आता अधिवेशनाच्या उर्वरित तीन दिवसात विरोधी पक्षनेता म्हणून विजय वडेट्टीवार हे काम सांभाळतील.






