Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vinod Tawade News: काँग्रेस काळातच अदानींंचा विकास झाला; विनोद तावडेंचा राहुल गांधींवर पलटवार

आज सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक सेफ काढली. या सेफ मधून त्यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो दखवले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Nov 18, 2024 | 03:53 PM
Vinod Tawade News: काँग्रेस काळातच अदानींंचा विकास झाला; विनोद तावडेंचा राहुल गांधींवर पलटवार
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि  उद्योगपती गौतम अदानी हे नातं जोडलं जात आहे, पण ते खरं नाही. एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है. अशा शब्दांत पलटवार करत भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. पण काही वेळापूर्वीच राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या ‘एक है तो सेफ है’ या नाऱ्यावरून भाजपवर टीका केली होती.

अदानी समुहाला मुंबईतील धारावीची जमीन हवी आहे. त्यासाठी भाजपकडून एक है तो सेफ है चा नारा दिला जात आहे. असा आरोप राहुल गांधी यांनी केला. इतकेच नव्हे तर धारावीचा नकाशा,  नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे एक पोस्टर दाखवत धारावीसाठी त्यांची एक लाख कोटींची डीलही झाली  असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या आरोपांना विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले.

‘रखडलेल्या विकासकामांच्या अंमलबजावणीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा’

विनोद तावडे म्हणाले, राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत 46 हजार कोटी रुपयांचा सोलार प्रोजेक्ट अदानी यांच्याबरोबर करण्यात आला.  अशोक गेहलोत यांनी अदानींना जमिनी दिल्या त्यावेळी अदानी कुणाचे होते. काँग्रेसने अदानींसोबत तेलंगाणामध्ये 12400 कोटी रुपयांचा करार केला, तेव्हा हे अदानी कोणाचे होते. युपीए सरकारच्या काळातच अदानी समुहाची विकास झाला. काँग्रेसच्या काळातच अदानी  यांचा देशात आणि परदेशात विकास झाला. 2014 सालच्या आधीचे आणि नंतर अदानी समुहाला मिळालेल्या काही प्रकल्पांची यादी आहे.

आज सकाळी राहुल गांधी यांनी आपल्या पत्रकार परिषदेत एक सेफ काढली. या सेफ मधून त्यांनी गौतम अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काही फोटो दखवले. असे फोटो जर काढायचेच होते तर आमच्याकडेही काही फोटो आहेत. असे सांगत तावडें यांनी गौतम अदानी आणि  काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी-वाड्रा यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे फोटो दाखवले  तसेच अशोक गेहलोत राजस्थानचे मुख्यमंत्री असताना, काँग्रेस नेते  शशी थरूर यांच्याबरोबर, तैलंगाणातील मुख्यमंत्री यांच्या बरोबर, हरियाणातील 2014 आधी मुख्यमंत्र्यांबरोबरचे असे अनेक फोटो आहेत.  काँग्रेस आण गौतम अदानी यांचं नातंं किती जुनं आहे, तेही सांगू शकतो, असा टोलाही तावडेंनी लगावला.

‘… यामुळे काय नुकसान होणार आहे?’ रश्मी शुक्लांविरोधातील याचिकेवर तातडीच्या सुनावणी 

दिवंगत राजीव गांधी यांच्या काळतच आपली ग्रोथ झाल्याचं गौतम अदानींनी स्वत:च सांगितलं आहे. काँग्रेसच्या काळातच त्यांचा सर्वात जास्त विकास झाला. पण धारावीत जे लोक राहतात, त्या सर्वांना नवी आणि पक्की घरं मिळणार आहेत. इंडस्ट्रीयल आणि कमर्शिअल गोष्टीही मिळणार आहेत. पण धारावीकरांनी कायम झोपडपट्टीत राहावं असं राहुन गांधी यांची इच्छा आहे. शेख यांना कंत्राट मिळालं नाही, म्हणून एक है तो सेफ है धारावी के लिए शेख है असं म्हणायचं का, अशा शब्दांत विनोद तावडेंनी काँग्रेसला सुनावलं आहे.

Web Title: Vinod tawade criticized rahul gandhi on dharavi nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2024 | 03:53 PM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • Rahul Gandhi

संबंधित बातम्या

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन
1

Pune Election: पुण्यात भाजपचा अनोखा प्रचार; प्रभाग २५ मध्ये ज्येष्ठ कार्यकर्त्यांचे पाद्यपूजन करून कचेरीचे उद्घाटन

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली
2

BMC Election 2026: किरीट सोमय्यांचे महाराष्ट्रविरोधी मनसुबे उघड; संजय राऊतांनी तोफ डागली

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर
3

Bhiwandi Municipal Election:भिवंडी महापालिका निवडणूक प्रचारात हिंसाचार: काँग्रेस-भाजप कार्यकर्त्यांमध्ये राडा, लाठी-काठ्यांचा वापर

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?
4

राहुल गांधी बनले राम; कॉंग्रेस नेते नाना पटोलेंनी उपमा देऊन केला सन्मान की अपमान?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.