Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : गुडघाभर खड्डे, पावसाचे पाणी अन् जीवघेणा प्रवास; व्याहाळी-धोम रस्त्याबाबत नागरिकांचा संताप

सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात व्याहाळी ते धोम धरणाखालचा महत्त्वाचा जोडरस्ता पाटबंधारे विभागाच्या परवानगीअभावी अपूर्णच राहिला आहे. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असले तरी कालव्यालगतचा सुमारे एक किलोमीटरचा भाग रखडल्याने गुडघाभर खड्डे, पावसाचे साचलेले पाणी आणि चिखलामुळे हा मार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 04, 2026 | 12:41 PM
गुडघाभर खड्डे, पावसाचे पाणी अन् जीवघेणा प्रवास; व्याहाळी-धोम रस्त्याबाबत नागरिकांचा संताप

गुडघाभर खड्डे, पावसाचे पाणी अन् जीवघेणा प्रवास; व्याहाळी-धोम रस्त्याबाबत नागरिकांचा संताप

Follow Us
Follow Us:
  • व्याहाळी-धोम रस्ता बनला मृत्यूचा सापळा
  • पाटबंधारे विभागाच्या भूमिकेमुळे नागरिक संतप्त
  • कोट्यवधींचा पूल तयार, पण जोडरस्ता रखडला
  • व्याहाळी-धोम मार्गावर जीव धोक्यात
वाई : सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पश्चिम भागातील व्याहाळी ते धोम हा धरणा खालचा रस्ता दोन्हीही भागांना जोडणारा मानला जातो धरणाच्या खाली मोठा कोट्यावधी रुपये खर्चून पूल बांधला असून हा पूल  हजारो नागरिकांच्या दैनंदिन दळणवळणाचा कणा ठरलेला आहे परंतु पाटबंधारे विभागाच्या कालव्याच्या कडेचा  मुख्य रस्ता आज पाटबंधारे विभागाच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अक्षरशः मृत्यूच्या सापळ्यात रूपांतरित झाला आहे. रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले असतानाही कालव्यालगतच्या सुमारे एक किलोमीटर रस्त्याला पाटबंधारे विभागाने परवानगी नाकारल्याने हा महत्त्वाचा दुवा आजही रखडलेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

या अपूर्ण रस्त्यावर गुडघाभर खड्डे पडले असून पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहनचालक आणि पादचारी दोघांच्याही जीवाला धोका निर्माण झाला आहे. सर्वसामान्य नागरिकांना या मार्गावरून चालणेही कठीण झाले असून दुचाकीस्वार रोज जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत. अनेक वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या या रस्त्यावर मुरूम टाकणे, खडीकरण करणे किंवा कोणतीही देखभाल करण्याचे सौजन्यही संबंधित विभागाने दाखवले नसल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

जावळी तालुक्यातील दापवडी येथे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक आक्रमक; शाळेसमोर बस थांब्याची मागणी, मेढा आगार प्रमुखांना निवे

हा रस्ता पश्चिम भागातील अनेक गावांना जोडणारा जीवनदायी दुवा असून शिक्षण, आरोग्य, शेती, व्यापार आणि सामाजिक नातेसंबंध टिकवून ठेवण्यात त्याची अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. मात्र केवळ प्रशासकीय अडेलतट्टूपणामुळे हजारो नागरिकांना रोज हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. विकासाच्या नावाने मोठमोठ्या घोषणा करणाऱ्या यंत्रणेने या भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिक करत आहेत. विशेष म्हणजे या परिसरात पर्यटनासाठी राज्यासह विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था पाहून अनेक पर्यटक या मार्गाने जाणे टाळत असल्याचे चित्र आहे.

परिणामी स्थानिक पर्यटन, रोजगार आणि व्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. लहान वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक ठरला असून अपघाताचा धोका दिवसेंदिवस वाढत आहे. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि अभियंत्यांनी केवळ कागदोपत्री अडथळे निर्माण करण्याऐवजी प्रत्यक्ष पाहणी करून या रस्त्याला तातडीने परवानगी द्यावी, कालव्यालगतच्या उर्वरित रस्त्याच्या कामास मंजुरी देऊन संपूर्ण रस्त्याचे डांबरीकरण तातडीने पूर्ण करावे, अशी जोरदार मागणी पश्चिम भागातील नागरिकांकडून होत आहे. आता तरी पाटबंधारे विभाग जागा होणार का, की एखादा मोठा अपघात झाल्यानंतरच प्रशासनाला खडबडून जाग येणार, असा संतप्त सवाल पश्चिम भागातील नागरिक उपस्थित करत आहेत.

हा रस्ता धरण निर्माण झाले त्या 1972 सालापासून कार्यरत आहे हा रस्ता धरणाच्या दोन्ही टोकांना जोडण्याचा दुवा ठरतो या दोन्ही टोकाच्या नातेसंबंधांना जोडण्याचा महत्त्वाचा दुवा मानला जातो या रस्त्याने मोठ्या प्रमाणात दळणवळण होत असते या रस्त्यामुळे पर्यटनाला चालना मिळते पुरणत काळातील धोम येथील मंदिरे पाहण्याकरता पर्यटक मोठ्या प्रमाणात ये जा करत असतात पर्यटक याच रस्त्याचा अवलंब करता त्यामुळे पाटबंधारे विभागाने याला तूर्ताच परवानगी द्यावी, अशी प्रतिक्रिया सचिन मानकुंबरे व्याहळी ग्रामस्थ यांनी दिली.

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

Web Title: Vyahali dhom road irrigation department delay dangerous road waai satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 12:41 PM

Topics:  

  • Infrastructure
  • maharashtra
  • Satara

संबंधित बातम्या

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप
1

मुबलक साठा असताना अचानक साखरेची दरवाढ का? राजू शेट्टी यांचा हल्लाबोल; 20 हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
2

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत
3

Amravati Hospital Fire: अमरावतीतील डफरीन रुग्णालयात अग्नितांडव; ३ नवजात बालकांचा मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून ५ लाखांची मदत

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?
4

शाळेतील वादातून दोन विद्यार्थ्यांवर चाकूने हल्ला, चोपातील घटनेनं खळबळ; नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.