Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Thane Building Collapse : ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

ठाण्यातील आझाद नगर परिसरातील मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळून १० वर्षीय जयकुमार जयस्वाल याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाले. मुसळधार पावसामुळे २५ ते ३० वर्षे जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर येते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 10, 2026 | 07:04 PM
ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

ठाण्यात पावसाचा कहर! मद्रास चाळीची गॅलरी कोसळली; १० वर्षीय मुलाचा मृत्यू, महिला व बालक जखमी

Follow Us
Follow Us:
  • ठाण्यातील आझाद नगरमधील चाळीचा भाग कोसळला
  • ठाण्यातील मद्रास चाळीतील पहिला मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला
  • घटनेत एक महिला व दोन लहान मुले जखमी झाल्याची माहिती
Thane Building Collapse News Marathi : ठाण्यातील आझाद नगर परिसरात हृदयद्रावक दुर्घटना घडली. मुसळधार पावसामुळे मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा भाग अचानक कोसळल्याने १० वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर एक महिला आणि एक लहान मुलगा जखमी झाले. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आझाद नगर येथील सुमारे २५ ते ३० वर्षे जुन्या मद्रास चाळीतील पहिल्या मजल्यावरील गॅलरीचा काही भाग अचानक कोसळला. या दुर्घटनेत जयकुमार जयस्वाल (वय १०) हा ढिगाऱ्याखाली अडकला. त्याला तातडीने बाहेर काढून सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

Mira Bhayandar News : मिरा-भाईंदरच्या विकास आराखड्यात मोठी उलथापालथ; १६४ फेरबदलांचा प्रस्ताव, नागरिकांकडून हरकती-सूचना मागविणार

या दुर्घटनेत उर्मिला जयस्वाल (वय ३०) आणि विनीतकुमार जयस्वाल (वय ८) हे जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक, अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या मदतीने दोघांनाही ढिगाऱ्यातून बाहेर काढून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच ठाणे अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग, प्रभाग समितीचे अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून इमारतीच्या उर्वरित भागाची सुरक्षितता तपासण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे इमारतीच्या गॅलरीचा भाग कमकुवत होऊन कोसळल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेनंतर परिसरातील जुन्या आणि धोकादायक इमारतींची तातडीने तपासणी करून आवश्यक ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेचा अधिक तपास सुरू असून दुर्घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे.

याच दरम्यान, गेल्या आठवड्यात पावसाशी संबंधित घटनांमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे ८०० जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. हवामानाशी संबंधित ताज्या घटनेत, वीज पडून दोन जण जखमी झाले. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मृत झालेले तिघेही ठाणे शहर, अंबरनाथ आणि मीरा-भयंदर येथील रहिवासी होते. या पावसाळ्यात पावसाशी संबंधित विविध घटनांमध्ये एकूण ११ जण जखमी झाले आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. तहसीलदार अभिजीत देशमुख यांनी सांगितले की, बुधवारी मुरबाड तालुक्यात एका किशोरवयीन मुलीसह दोन जण वीज पडून जखमी झाले. दोघांनाही तातडीने टोकावडे प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू असून ते धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Mira Bhayandar News : 450 कोटींचे रस्ते आणि 42 कोटींचे खड्डे; मीरा-भाईंदर महापालिकेचा ‘विकास’ की जनतेच्या पैशांची उधळपट्टी?

Web Title: Thane azad nagar gallery collapse 10 year old boy dies news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:04 PM

Topics:  

  • Heavy Rain
  • maharashtra
  • thane

संबंधित बातम्या

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र
1

ऑफिस, रिटेल, F&B अन् अर्बन लॉजिस्टिक्स एकाच छताखाली; ठाण्यात उभारतेय भारतातील पहिले एकात्मिक शहरी व्यावसायिक केंद्र

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद
2

Dombivli News: डोंबिवलीतील माणगावमध्ये चाळींवर जेसीबी; रहिवासी-विकासक आमनेसामने, मालकी हक्कावरून वाद

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार
3

Devendra Fadnavis: सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’
4

आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा 13 वा दिवस! अशोक उईकेंच्या राजीनाम्याची मागणी, ‘काही झाल्यास प्रशासन जबाबदार’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.