Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास! यशोदा नदीच्या पुरात ३ जण अडकले

र्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jun 26, 2025 | 06:47 PM
शाळेसाठी जीवघेणा प्रवास! यशोदा नदीच्या पुरात ३ विद्यार्थी अडकले

शाळेसाठी जीवघेणा प्रवास! यशोदा नदीच्या पुरात ३ विद्यार्थी अडकले

Follow Us
Follow Us:

राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू असून अनेक नद्यांना पूर आला आहे. त्यातच वर्धा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी आहे. वर्ध्याच्या देवळी तालुक्याच्या डिगडोह येथे यशोदा नदीला आलेल्या पुरात तीनजण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. तीघंही विद्यार्थी असल्याचं सांगितलं जात आहे.

Maharashtra Monsoon Alert: ‘या’ जिल्ह्यांत वरुणराजा असा कोसळणार की…; मराठवाड्यात अतिवृष्टी अन् IMD च्या अलर्टने वाढवली झोप

डिगडोह येथे सध्या यशोदा नदीवर पूल बांधकाम सुरू असून त्यामुळे पाण्याचा प्रवाह अडवण्यात आला होता. याच मार्गाने नागझरी येथील इयत्ता दहावीचा विद्यार्थी भाविष कापसे आणि डोगडोह येथील त्याचे दोन मित्र शाळेतून परत येत असताना अचानक पाण्याची पातळी वाढली. आणि ते तिघेही पुराच्या पाण्यात अडकले. फायर ब्रिगेड आणि जिल्हा शोध व बचाव पथकाच्या मदतीने शर्थीचे रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आलं. अखेर तिन्ही विद्यार्थ्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश आलं असून सध्या त्यांची प्रकृती ठणठणीत आहे.

दरम्यान, विदर्भात अन्यत्रही मुसळधार पावसामुळे अनेक भागांत जनजीवन विस्कळीत झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असून विशेषतः मेहकर तालुक्यात जोरदार पावसामुळे अनेक नदी-नाल्यांना पूर आला आहे. कास नदीला आलेल्या पुरामुळे मादणी आणि आरेगाव या गावांचा वाशिम जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.

वाशिम जिल्ह्यात मागील २० तासांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. नागपूर-संभाजीनगर महामार्गावरील पिंप्री सरहद गावाजवळ उतावळी नदीवर पाण्याचा जोर वाढल्याने रस्त्यावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. अनेक वाहनचालकांना तासनतास थांबून रहावं लागत आहे.

कोयना धरणातील पाणीसाठ्यात होतीये वाढ; पाणीसाठा पोहोचला 43.99 टीएमसीवर

नांदेड जिल्ह्यात काल मध्यरात्रीपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पैनगंगा नदीची पातळी वाढली आहे. परिणामी सहस्त्रकुंड धबधब्याचे रौद्ररूप पुन्हा एकदा पहायला मिळत आहे. मागील १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने धबधब्याचा प्रवाह कमी झाला होता. मात्र कालच्या पावसामुळे धबधबा पुन्हा ओसंडून वाहत आहे. संपूर्ण विदर्भात पावसाचा जोर कायम असून प्रशासन सतर्क आहे. पुरामुळे अडकलेल्या नागरिकांची मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज असून विविध भागांमध्ये बचावकार्य सुरू आहे.

Web Title: 3 school students trapped in yashoda river in wardha devali latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • wardha
  • wardha News
  • wardha river

संबंधित बातम्या

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद
1

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड
2

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास
3

Wardha News: वर्ध्यात रोजगार निर्मितीला मोठी चालना; ३,०११ कोटींचे सामंजस्य करार, उदय सामंतांचा मोठा विश्वास

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन
4

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.