Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘सरकारला जागे करण्यासाठी एकत्र लढू,’ रोहित पवार याचे प्रतिपादन; स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

हिंगणघाटमध्ये स्मार्ट मीटरविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून मोर्चा काढण्यात आला. आमदार रोहित पवार यांनी स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

  • By विवेक
Updated On: Aug 25, 2026 | 03:33 PM
स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात मोर्चा

Follow Us
Follow Us:
  • रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाटात आंदोलन
  • स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट होत असल्याचा रोहित पवारांचा आरोप
  • रोहित पवारांच्या प्रवेशावेळी काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न
 

हिंगणघाट : राज्य सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. सरकारला झोपेतून जागे करण्यासाठी एकत्र लढावे लागेल. या लढ्यात सर्वसामान्यांची साथही आता आवश्यक झाली आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी केले.

स्मार्ट मीटरविरोधात हिंगणघाट येथे राष्ट्रवादीतर्फे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सोमवारी, २४ रोजी मोर्चा काढण्यात आला. आंदोलनाच्या अनुषंगाने आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. मंचावर प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, खासदार अमर काळे, माजी आमदार भुसारा, अनिल जवादे, प्रदेश प्रवक्ते नितेश कराळे, विनोद वानखेडे, अमोल बोरकर, नगरसेविका शीतल बोरकर, लोणकर, महेश झोटिंग, शुभांगी डोंगरे, सुनील पिंपळकर, मोहम्मद रफीक आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

रोहित पवार पुढे म्हणाले, राज्यात स्मार्ट मीटरच्या माध्यमातून लुटमार सुरू आहे. हे स्मार्ट मीटर आधी शासकीय कार्यालयात लावू, ही चाचणी यशस्वी झाल्यावर ५ वर्षानंतर सर्वसामान्यांच्या घरी लावू, असे शासनाने जाहीर केले होते. मात्र, आता जबरदस्तीने हे मीटर सर्वसामान्यांच्या घरी लावण्याची मोहीम सुरू आहे. स्मार्ट मीटर लावण्यासाठी २७ हजार कोटी रुपयांचे लक्ष्य आहे. भ्रष्टाचारासाठी सत्ताधाऱ्यांनी हे भूत उभे केल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला. शेतकऱ्यांना न मिळणारा हमीभाव, भरमसाठ वाढलेले खताचे भाव यावरही त्यांनी टीका केली. राज्य सरकारने फसवी कर्जमाफी जाहीर केली होती. त्यावर आपण आंदोलन केले. त्याचा फायदा आता ५५ लाख शेतकऱ्यांना होईल, असा दावाही त्यांनी याप्रसंगी केला.

Devendra Fadnavis: ‘२०२९ पूर्वी फडणवीसांनी पंतप्रधान व्हावं’; विजय वडेट्टीवारांच्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण

शक्तिपीठ मार्गाच्या माध्यमातून ४० हजार कोटींचा भ्रष्टाचार होणार असल्याचा दावाही यावेळी त्यांनी केला.

सत्ताधाऱ्यांकडून काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न:

आंदोलनादरम्यान विविध मागण्यांचे निवेदन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांना सादर केले. विशेष म्हणजे रोहित पवार व शशिकांत शिंदे यांचा हिंगणघाट शहरात प्रवेश होत असताना कारंजा चौक येथे सत्ताधारी नगरसेवकांकडून काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न झाला. हे लक्षात येताच पोलिसांनी संबंधित नगरसेवकांना ताब्यात घेतले.

महाराष्ट्रातील हा पहिला ऐतिहासिक मोर्चा – शशिकांत शिंदे

स्मार्ट मीटरविरोधात महाराष्ट्रातील हा पहिला ऐतिहासिक व प्रचंड मोर्चा असल्याचे यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले. भर पावसात शरद पवार यांनी सभेला संबोधित केले होते, तर आजही पावसाला न जुमानता हिंगणघाट येथे मोर्चा झाला. पाऊस पडतो तेव्हा क्रांती होते, येथेही क्रांती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला, सुलतानपूर येथील पुलासाठी एक महिन्याची मुदत आपण प्रशासनाला देत असून त्यानंतर आपण स्वतः येथे येऊ व अधिकाऱ्याना धडा शिकवू असा निर्वाणीचा इशारा शशिकांत शिंदे यांनी दिला.

प्रमाणपत्रांच्या त्रुटी दोन-तीन दिवसांत दूर करणार; मनोज जरांगे पाटलांच्या मागण्यांवर राज्य सरकार सकारात्मक

Web Title: Wardha hinganghat smart meter protest rohit pawar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 03:33 PM

Topics:  

  • rohit pawar
  • Shashikant Shinde
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?
1

Wardha News : वर्ध्याच्या 209 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला ब्रेक, 14 गावांच्या पाणीपुरवठा योजनेचं पुढे काय?

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता
2

Wardha News : जिल्ह्यावर दुष्काळाचे ढग गडद, आठही तालुके दुष्काळी यादीमध्ये, आगामी काळात पाणीटंचाई वाढण्याची चिंता

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका
3

५००० रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा! दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीवरून शशिकांत शिंदेंनी केली सरकारवर टीका

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण
4

Wardha News : सोयाबीनचा भाव वाढला, पण शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही! वर्ध्यातील बाजारभावामुळे चर्चेला उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.