Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : ‘एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या’, उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

Wardha News ; वर्धा जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी एमआयडीसीतील रिक्त भूखंडांचा प्रभावी वापर करण्याचे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. उद्योग सुरू न करणाऱ्या भूखंडधारकांची ए, बी आणि सी श्रेणीत वर्गवारी करून नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

  • By विवेक
Updated On: Aug 31, 2026 | 02:43 PM
'एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या', उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

'एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना द्या', उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांचे प्रतिपादन

Follow Us
Follow Us:
  • एमआयडीसीतील रिक्त भूखंड नव्या उद्योजकांना देण्याचे निर्देश
  • भूखंडधारकांची ए, बी आणि सी श्रेणीत वर्गवारी होणार
  • उद्योजकांच्या स्थानिक समस्या सोडवण्यासाठी विभागांमध्ये समन्वय साधण्याच्या सूचना
 

Wardha News : जिल्ह्यातील औद्योगिक गती देण्यासाठी विकासाला एमआयडीसीतील उपलब्ध भूखंडांचा प्रभावी वापर करावा. भूखंड घेऊनही उद्योग सुरू न करणाऱ्या उद्योजकांचा सविस्तर आढावा घेऊन भूखंडधारकांची ए, बी आणि सी अशा त्रिस्तरीय श्रेणीत वर्गवारी करावी. प्रत्यक्ष उद्योग सुरू असलेल्यांना ‘ए’, उद्योग सुरू करून सध्या बंद असलेल्यांना ‘बी’, तर भूखंड घेऊन अद्याप उद्योग सुरू न करणाऱ्यांना ‘सी’ श्रेणीत समाविष्ट करून नियमानुसार कार्यवाही करावी. तसेच एमआयडीसीतील खुले भूखंड नव्या उद्योजकांना उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योग, एमआयडीसी, सीएमईजीपी योजनेचा आढावा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या उपस्थितीत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी वान्मथी सी., एमआयडीसी संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे, नागपूर विभागाचे उद्योग व सेवा सहआयुक्त शिवकुमार मुद्दमवार, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग व सेवा सहाय्यक आयुक्त सुनील हजारे आदींची उपस्थिती होती.

पीएम विश्वकर्मा या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धा येथून करण्यात आला होता. या योजनेंतर्गत प्रशिक्षण पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना कीट वाटप करताना त्यातून प्रत्यक्ष रोजगार निर्मिती करणाऱ्या लाभार्थ्यांचा सर्वेक्षणाद्वारे शोध घ्यावा. अशा लाभार्थ्यांना व्यवसायासाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी, असे उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले.

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

स्थानिक उद्योजकांच्या अडचणी सोडविण्यावर भर

एमआयडीसीत उद्योजकांना नुसती जमीन देऊन काम होणार नाही तर त्यांना मुख्य रस्ता, पाणी, विद्युत सबस्टेशन आदी सुविधा उपलब्ध करून द्या. जिल्हा उद्योग केंद्रामार्फत बँकांशी समन्वय ठेवून कर्ज मंजुरीवर भर द्या. उद्योजकांच्या छोट्या छोट्या समस्या स्थानिक पातळीवर सोडवून त्यांना सहकार्य करा. जिल्हाधिकारी व एमआयडीसी तसेच उद्योग केंद्राचे अधिकारी यांनी उद्योजकांसोबत बैठक घेऊन त्यांच्या अडचणी सोडवण्यावर भर द्यावा, अशा सूचना पालकमंत्री डॉ. भोयर यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिल्या.

उद्योजकांशी साधला संवाद

वर्धा जिल्ह्यातील उद्योजकाशी उद्योग मंत्री व पालकमंत्री यांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. प्रदूषण महामंडळाची परवानगी, इंधन विहिरीची परवानगी, एमएसडीसीएलमार्फत मिळणारे अनुदान, फायर सेफ्टी ना हरकत प्रमाणपत्र आदीसाठी येणाऱ्या समस्या उद्योग मंत्र्यांसमोर मांडल्या. यावेळी त्यांनी संबंधित विभागाला यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे निर्देश दिले. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचनाही दिल्या.

Wardha News : एसएनसीयूमध्ये एकच व्हेंटिलेटर, जिल्हा रुग्णालयातील प्रकार; रेफर आऊटवर दिला जातोय भर

Web Title: Wardha news udyogmantri uday samant midc vacant plots new entrepreneurs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • MIDC
  • Uday Samant
  • wardha News

संबंधित बातम्या

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…
1

Ratnagiri News: रत्नागिरीत सुमारे २,१५९ कोटींची ऐतिहासिक गुंतवणूक; जिल्हा गुंतवणूक परिषदमध्ये…

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार
2

Manoj Jarange Patil: ‘पुढच्या 24 तासांत योग्य निर्णय घेऊ’, उदय सामंतांचा मोठा दावा; जरांगेंची भेट घेणार

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…
3

तळेगावजवळ उभारणार नवीन MIDC! तब्बल 1100 एकर क्षेत्राचा प्रस्ताव; दरनिश्चितीनंतर…

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल
4

Wardha News : क्रीडा संकुल की समस्यांचे माहेरघर? पाणी, स्वच्छतागृह, ट्रॅकचा अभाव; अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरही सवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.