
Gas Cylinder
जिल्ह्यात एकूण ३ लाख ९६ हजार ५१९ घरगुती गॅस सिलिंडरधारक आहेत. त्यामध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ६० हजार ४०५ लाभार्थ्यांचा समावेश आहे. यापैकी ५१ हजार २८४ लाभाथ्यांनी २३ ऑगस्टपर्यंत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. मात्र, उर्वरित ९,१२१ लाभार्थी अद्याप या प्रक्रियेपासून दूर आहेत. सामान्य नागरिकांना घरगुती गॅसची नवीन जोडणी घेताना साधारणपणे ५ ते ६ हजार रुपयांपर्यंत खर्च करावा लागतो. त्याशिवाय त्यांना मिळणारी सबसिडीही अत्यल्प असते. याउलट प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना केवळ १०० रुपयात गॅस जोडणी उपलब्ध करून देण्यात येते तसेच प्रत्येक गॅस सिलिंडरवर शासनाकडून ३०० रुपयांचे अनुदान दिले जाते.
उज्ज्वला योजनेतील लाभार्थ्यांसाठी हे अनुदान मोठा आर्थिक आधार ठरत आहे. मात्र, ई-केवायसी वेळेत न केल्यामुळे अनुदानाचा लाभ बंद झाल्यास सिलिंडर खरेदीचा संपूर्ण खर्च संबंधित लाभार्थ्यांनाच करावा लागणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता आहे.
वर्ध्यात 31.77 लाखांचा स्वस्त धान्य घोटाळा; निलंबनानंतर SIO आणि रेशन दुकानदारावर गुन्हा दाखल
गॅस सिलिंडर धारकांना शासनाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सबसीडीचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे क्रमप्राप्त आहे. त्याकरिता २३ ऑगस्ट ही अंतिम मुदत देण्यात आली होती. पण चक्क उज्ज्वला योजनेव्या तब्बल ९१२१ लाभार्थ्यांनी वेळीच ई-केवायसी न केल्याने त्यांच्यावर शासनाच्या अनुदानापासून वंचित राहण्याची वेळ ओढावणार आहे. विशेष म्हणजे ई-केवायसीच्या मुदतवाढीबाबत २४ ऑगस्टला दुपारी २ वाजेपर्यंत कुठलीही सूचना प्रशासनातील पुरवठा विभागाला मिळालेली नव्हती.