Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

म्हसवडमध्ये पाणी संकट गडद! ८० कोटींच्या नवीन योजनेच्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप

म्हसवड शहरात ८० कोटींच्या अमृत २.० पाणी पुरवठा योजनेच्या मुख्य जलवाहिनीला पुन्हा मोठी गळती लागली आहे. आधीच १५ दिवसांनी पाणी मिळत असताना लाखो लिटर पाणी वाया गेल्याने म्हसवडकर नागरिक संतप्त झाले आहेत.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 27, 2026 | 03:09 PM
म्हसवडमध्ये पाणी संकट गडद! ८० कोटींच्या नवीन योजनेच्या जलवाहिनीला गळती; लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप
Follow Us
Follow Us:

 

  • म्हसवडमध्ये पाणी संकट गडद!
  • ८० कोटींच्या नवीन योजनेच्या जलवाहिनीला गळती
  • लाखो लिटर पाणी वाया गेल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप
म्हसवड दि. २६ (महेश कांबळे): म्हसवड शहराला पिण्याच्या पाण्यासाठी अगोदर १५ दिवस नागरिकांना वाट पहावी लागत आहे, शहराचा पाणी पुरवठा अगोदरच विस्कळीत झाला असल्याने पिण्याच्या पाण्याची शहरात बोंबाबोंब सुरु आहे, अशातच पालिकेच्या शिलेदारांनी अहोरात्र कष्ट करुन शहराचा पाणी सुरळीत केला, मात्र दुसर्याच दिवशी शहराला पाणी पुरवठा करणार्या जलवाहिनीला अचानक गळती लागल्याने लाखो लिटर पाणी वाया गेल्याने शहराचा पाणी पुरवठा पुन्हा विस्कळीत तर होणार नाही ना ? असा संतप्त सवाल म्हसवडकर जनता करीत आहे.

म्हसवड पाणी पुरवठा योजनेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासुन शहराला सायपन पध्दतीने पाणी पुरवठा केला जातो, या योजनेसाठी राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केंद्र शासनाच्या २.० योजनेंतर्गत सुमारे ८० कोटींचा निधी म्हसवड पालिकेला उपलब्ध करुन दिलेला आहे. निधी प्राप्त होताच नुतन कामाचा धडाका गत दोन वर्षापासुन सुरु आहे, या योजनेची नूतन जलवितरण नलिका पालिका हद्दीत सर्वत्र टाकण्यात आलेली आहे, मात्र योजनेच्या पाणी साठवण तलावापासुन ते जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत या योजनेच्या टाकण्यात आलेल्या नुतन जलवाहिनीला वारंवार गळती लागल्याने शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे, याचा थेट परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होवुन शहराला पिण्याचे पाणी १५ दिवसांतुन एकवेळ म्हसवडकरांना सध्या मिळत आहे.

यामुळे अगोदरच म्हसवडकर जनता अगोदरच पाण्यासाठी त्रस्त झालेली आहे जनतेची ही ओरड राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी ऐकुन सदर पाणी योजनेस गत अठवड्यात भेट देवुन सर्व कर्मचारी व अधिकार्यांसह पदाधिकार्यांना कडक शब्दात सुचना देत शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करण्याचे फर्मान काढले, मंत्री महोदयांचा आदेश शिरस्त्नानी मानुन पालिकेकेतील त्यांच्या शिलेदारांनी अहोरात्र कष्ट करुन शहराचा विस्कळीत झालेला पाणीपुरवठा सुरळीत केला, नुतन जलवाहिनीतुन पाणी एकवेळ म्हसवडकरांना सोडले मात्र ते पाणी अतिशय खराब आल्याने म्हसवडकरांची तहान काही भागलीच नाही, परिणामी म्हसवडकरांची पाण्याची ओरड आजही कायम आहे.

“प्रत्येक कुटुंबासोबत ठामपणे उभा राहणार”, आंबेनळीतील दुःखद दुर्घटनेनंतर उदयनराजेंकडून पीडित कुटुंबीयांना आधार

विशेष म्हणजे जलशुध्दीकरण केंद्रापासुन ते शहरातील विविध भागातील पाण्याच्या टाक्यांपर्यंत हे पाणी सायपन पध्दतीने नेले जात आहे, त्या पाण्याची नुतन जलवाहिनी ही जमीनीखालुन नेली आहे, काल दि.२६ रोजी सकाळी याच जलवाहिनीला गळती लागुन त्याद्वारे लाखो लिटर पाणी वाया गेल्याने अगोदरच पाण्याचा दुष्काळ त्यात हा १३ वा महिना असाच काहीसा प्रसंग येथे निर्माण झाला आहे, त्यामुळे याचा थेट परिणाम पुन्हा एकदा पिण्याच्या पाणीपुरवठ्यावर होईल अशी भिती आता म्हसवडकर जनता व्सक्त करीत असुन लवकरात लवकर हा पाणी पुरवठा सुरळीत व्हावा अशी अपेक्षा सामान्य म्हसवडकर जनता करीत आहे.

जर ट्रायल टप्प्यातच अशा प्रकारच्या त्रुटी समोर येत असतील तर भविष्यात योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यानंतर शहराचा पाणीपुरवठा कितपत सक्षम राहील, हा मोठा प्रश्न आहे. “इतक्या मोठ्या खर्चाच्या योजनेत सुरुवातीलाच अशा अडचणी येत असतील तर पुढे पुन्हा जुन्याच समस्यांना सामोरे जावे लागेल का?” अशी चर्चा शहरात सुरू झाली आहे.
दरम्यान, शहरातील अनेक भागात आधीच पाणी उशिरा पोहोचत असल्याने नागरिकांना टँकर, विहिरी आणि पर्यायी साधनांवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे नवीन योजनेचे काम लवकर पूर्ण करून तांत्रिक दोष दूर करावेत, अशी मागणी जोर धरत आहे. सध्या या घटनेमुळे शहरातील नागरिकांचे लक्ष या योजनेच्या गुणवत्तेकडे लागले असून, दुरुस्तीनंतर योजना किती परिणामकारकपणे कार्यान्वित होते का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. याबाबतीत म्हसवड पालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन माने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर जलवाहिनीवरील काम युध्द पातळीवर सुरु असुन आज रात्री पर्यंत या जलवाहिनीतुन पाणी पुरवठा पुन्हा जोमात सुरु होईल असे सांगितले.

आंबेनळी दुर्घटनेतील आठ तरुणांना अश्रुपूर्ण निरोप, आसगाव, मर्ढे आणि खटाव गावांमध्ये शोककळा; मध्यरात्री अंत्यसंस्कारावेळी हंबरडा

Web Title: Water crisis deepens in mhaswad leakage in pipeline of new 80 crore scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Mhaswad
  • Water Crisis

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती
1

Ahilyanagar News: भीषण दुष्काळामुळे गाव सोडण्याची वेळ! अहिल्यानगरच्या चापडगावात 1972 पेक्षाही भयावह परिस्थिती

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ
2

Ahilyanagar News : १९७२ पेक्षाही भीषण दुष्काळ? चापडगावात पाण्यासाठी गावकऱ्यांवर स्थलांतराची वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.