मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकते. राज्याच्या राजकारणात अतिशय वेगाने घडामोडी घडताहेत. रविवारी (२ जुलै) राज्याच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला. राष्ट्रवादीतून (NCP) काही आमदारांना घेऊन अजित पवार शिंदे-फडणवीस (Shinde fadnavis) सरकारमध्ये सामील झाले आहेत. राज्यातल्या सत्तानाट्याच्या या सगळ्या घडामोडीनंतर सगळी राजकीय समीकरणं बदलणार आहेत. एकिकडे अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील दोन गट पडले आहेत, तर अजितदादा गटाच्या सरकारमधील समावेशामुळं शिंदे गटातील आमदार आता उघडपणे नाराजी व्यक्त करताहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीत दोन गट पडल्यामुळं पक्ष व चिन्हावर अजितदादा गटाने दावा केला आहे. तर शरद पवार आज नाशिकमधील येवल्यात सभा घेणार आहेत. या धरतीवर आमदार जितेंद्र आव्हाडांनी एक मोठं वक्तव्य केलं आहे.
आम्ही बाहेर पडतो पण…
दरम्यान, आज माध्यमांशी संवाद साधताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुम्हाला जर बडव्यांचा त्रास होत असेल तर आम्ही बाहेर पडतो. मी बाहेर पडतो. तुम्ही जर येणार असाल तर मी राजकारणातून संन्यास घेतो पण तुम्ही परत या, अशी भावनिक साद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना घातली आहे. जर तुम्हांला आमच्या बडव्यांचा त्रास होत असेल तर आम्ही बडवे बाजूल होतो. पण तुम्ही परत या असं आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.
नको ती पदं…राजकारण आणि साखर कारखाना
पुढे बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, जर तुम्ही परत येणार असाल तर आम्ही बडवे बाजुला होतो. आम्हाला सत्ता नको, राजकारण, पदं काहीही नको. नको साखर कारखाना, नको संस्था काहीही नको. मी बाजुला होतो पण तुम्ही परत या. एवढेच काय मी जयंत पाटलांना देखील बाजुला व्हायला सांगतो, पण तुम्ही परत या…अशी भावनिक साद आमदार जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांना घातली आहे. त्यामुळं यावर अजित पवारांचे काय उत्तर येते हे पाहवे लागेल.