Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Mar 30, 2026 | 01:16 PM
बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

बाजारात गव्हाचे दर घसरले! आखाती युद्धाचा परिणाम; क्विंटलमागे ६०० रुपयांचा बसतोय फटका

Follow Us
Follow Us:

आखाती देशांतील तणावाचे पडसाद आता थेट ग्रामीण अर्थव्यवस्थेवर उमटू लागले. इराण, इस्त्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे जागतिक बाजारपेठेत निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम विदर्भातील शेतीमालाच्या दरांवर होत आहे. विशेषतः यवतमाळ जिल्हा येथे रब्बी हंगामातील गव्हाला अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.(फोटो सौजन्य – istock)

रेती धोरणाची अंमलबजावणी होईना! नदी, नाल्यांच्या गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे भाव कडाडले

दरवर्षी प्रतिक्विंटल २८०० ते ३२०० रुपये दर मिळणाऱ्या गव्हाला यंदा २,१०० ते २,२०० रुपये दर मिळत असून सुमारे ६०० रुपयांचा फटका बसत आहे. केंद्र सरकारने २०२५-२६ साठी २३२५ रुपये हमीभाव जाहीर केला असला, तरी प्रत्यक्ष व्यवहारात तोही मिळत नसल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून होत आहे. यावर्षी पुरेशी थंडी, पोषक वातावरणात रब्बी गहू पिकाचे चांगले उत्पादन झाले. काहींना तर एकरी १२ ते १५ क्विंटल याप्रमाणे गव्हाचे उत्पादन झाले. त्यामुळे शेतकरी आनंदात असताना बाजारपेठेतील गव्हाच्या दरात मोठी घसरण झाली. उत्पादन खर्च निघणार किंवा नाही, यामुळे गहू उत्पादक शेतकरी हताश झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील बहुतांश भागात खरीप हंगामात कापूस आणि सोयाबीन ही नगदी पिके घेतली जातात, तर रब्बीमध्ये गहू व हरभरा पिकवले जाते. मात्र यंदा खरीप हंगामातच अतिवृष्टीने मोठे नुकसान झाले. ऑगस्ट-सप्टेंबरमधील पावसामुळे कापूस आणि सोयाबीन उत्पादन घटले. त्यानंतर काही भागात झालेल्या गारपिटीनेही शेतकऱ्यांचे नुकसान वाढले आहे. त्यामुळे आधीच नुकसान आर्थिक अडचणीत आता गव्हाच्या घसरलेल्या दराचा दुहेरी फटका बसत आहे. एकरी खर्चाचा हिशोब पाहता आता शेतकऱ्यांच्या हाती काही ठरते की नाही हाच मोठा विषय आहे.

कर्जमुक्तीच्या घोषणेनंतरही वसुलीचा तगादा! पुसद, महागावमध्ये कर्जदार शेतकऱ्यांना बँकांकडून नोटीस

प्रत्येकवेळी शेतपिकांचेच दर का पडतात

सध्या आखाती देशात युध्दजन्य परिस्थिती आहे. १५०० अशात गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल यासह अनेक वस्तुच्या किमती एकाएकी वाढल्या. युद्ध असो, महागाई असो किंवा जागतिक तणाव याचा परिणाम इंधन, गॅस, खाद्यतेल यांसारख्या वस्तूंवर थेट दिसतो; पण शेतमालाच्या बाबतीत उलट चित्र दिसते. देशात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी प्रत्येकवेळी शेतपिकांचेच दर का पडतात असा प्रश्न शेतकरी विचारत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

 

Web Title: Wheat prices fell in the market the aftermath of the gulf war 600 rupees per quintal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 01:16 PM

Topics:  

  • US-Israel Iran War
  • Yavatmal
  • yavatmal news

संबंधित बातम्या

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे
1

Gulf Crisis: इराण युद्धामुळे आखाती देश अमेरिकेवर का संतापले? ‘मक्का संरक्षण करारा’ने बदलली मध्य पूर्वेची भू-राजकीय समीकरणे

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार
2

BRICS2026: अमेरिकेच्या डॉलरला थेट आव्हान! इराणचा ब्रिक्समध्ये मास्टरस्ट्रोक; रुपया, युआन अन् रुबलमध्ये होणार आंतरराष्ट्रीय व्यापार

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य
3

CENTCOM: सैनिक ‘USS Abraham Lincoln’ वरून समुद्रात उड्या मारून का करत आहेत आत्महत्या? पेंटागॉनने उघड केले सत्य

Iran War Strategy: ‘ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण युद्ध सुरूच ठेवणार’; IRGC अधिकाऱ्याचा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा मोठा दावा
4

Iran War Strategy: ‘ट्रम्पचा कार्यकाळ संपेपर्यंत इराण युद्ध सुरूच ठेवणार’; IRGC अधिकाऱ्याचा अमेरिकेला उद्ध्वस्त करण्याचा मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.