पुणे : महागाई दरात वारंवार वाढ होत आहे. एप्रिलमध्ये महागाई दर ७. ७९ इतका झाला असून मार्चमधील महागाई दराच्या तुलनेत एप्रिलमध्ये एका टक्क्यानी वाढ झाली आहे. त्यावरून विरोधकांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे यांनी महागाईवरून अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.
राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे यांनी महागाईवरून अच्छे दिन कुठे आहेत? असा सवाल मोदी सरकारला उपस्थित केला आहे. रुपाली ठोंबरे यांनी ट्वीट करत अच्छे दिन कुठे आहेत असा प्रश्न उपस्थित केला आहे.
[read_also content=”आ. रोहित पवारांच्या विशेष प्रयत्नातून मतदारसंघातील आयटीआयचे रूप पालटले! https://www.navarashtra.com/maharashtra/come-on-rohit-pawars-special-efforts-changed-the-face-of-itis-in-the-constituency-nrdm-279520.html”]
महागाईवरून २०१४ ला आगीचा डोंब उठवला होता. तीच महागाई आटोक्यात आणणार म्हणून लोकांनी भाजपाला सत्तेत आणले आणि आज महागाई दर ७. ७९ इतका झाला. असा टोला त्यांनी भाजपा आणि केंद्र सरकारवर लगावला आहे.