धुळे : दुचाकी वाहन सोडण्यासाठी (Bike) केवळ दोनशे रुपयांची लाच (Bribe) मागून ती स्वीकारणाऱ्या धुळे शहर वाहतूक विभागातील (Dhule City Traffic Police) पोलीस हवालदार उमेश दिनकर सूर्यवंशी (Police Constable Umesh Dinkar Suryavanshi) यास धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Dhule ACB) अटक केली आहे. या अटकेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या नेतृत्वात धुळे शहरातील बारफत्तर चौकातील अँग्लो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर हा सापळा यशस्वी करण्यात आला आहे.
तक्रारदार हे चाळीसगाव येथील रहिवाशी असून ते मोटारसायकलवर धुळे येथे नेहमी कामानिमित्त येत असत. धुळे शहरात मोटारसायकलने प्रवास करताना त्यांना तहसिल चौकात तसेच अँग्लो उर्दु हायस्कूल जवळ ड्युटीस असलेले ट्राफिक पोलीस त्यांना विनाकारण अडवून त्यांच्याकडे डायव्हिंग लायन्सस असताना देखील कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांच्याकडे २०० ते ५०० रूपयाची मागणी करत, त्यांच्या मागणीप्रमाणे पैसे दिले नाही तर ट्राफिक पोलीस त्यांना जाऊ देत नसत व त्यांच्या वाहनांवर मोठ्या रकमेचा ऑनलाईन दंड टाकू, अशी धमकी देत होते.
[read_also content=”होंडाचं ठरलं, नावही निश्चित केलं आणि घोषणाही झाली, नवीन SUV म्हणजेच असणार आहे ‘होंडा एलिव्हेट’ https://www.navarashtra.com/automobile/honda-has-announced-the-name-of-its-upcoming-all-new-suv-as-the-honda-elevate-nrvb-394713.html”]
तक्रारदार यांना तेथे ड्युटीस असलेल्या ट्राफिक पोलिसांचा नेहमीचा व पैसे वसुलीचा त्रास होत असल्याने त्यांनी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे २ मे रोजी लेखी तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून ही कारवाई केली असल्याचे प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीची आज रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान धुळे शहरात जुना आग्रा रोड लगत अग्लो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश दिनकर सुर्यवंशी यांनी तक्रारदार यांना थांबवून त्यांच्याकडे वाहनांवर ऑनलाईन दंड नको असेल तर २०० रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली. सदर २०० रुपये लाचेची रक्कम स्वतःसाठी धुळे शहरातील अग्लो उर्दू हायस्कूल समोरील रस्त्यावर स्विकारताना त्यांना आज रंगेहात पकडण्यात आले आहे.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 3 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-3-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]
त्यांच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 चे कलम 7 अन्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ट्रॅफिक हवालदारावर झालेल्या या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ माजली आहे.