मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी ११ लाख रुपये रक्कम सापडल्यावर त्यांच्यावर ईडीची (ED) चौकशी करण्यात आली. मग शिंदे गटाने आयोजित केलेल्या दसऱ्या मेळाव्यासाठी (Dasara melava) आरक्षित केलेल्या एसटी महामंडळाच्या विशेष बसेससाठी (Special buses) भरण्यात आलेल्या ९ कोटी ९९ लाख रुपयांची रक्कम भरलेल्या व्यक्तीची चौकशी करणार का? असा सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी करत सदर व्यक्तीचा उत्पन्न स्रोत व ओळख जाहीर करण्याची मागणी एसटी महामंडळाकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
[read_also content=”डॉ.श्रीकांत शिंदे यांचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भावनिक पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/shrikant-shinde-write-letter-to-udhav-thackeray-333296.html”]
दरम्यान, शिंदे गटाने आयोजित केलेला दसरा मेळाव्यासाठी १७९५ एसटी महामंडळाच्या विशेष बसेस राज्यातून बुक करण्यात आल्या. या बसेस आरक्षित केल्यानंतर ९ कोटी ९९ लाख ४० हजार ५०० रुपये रोख स्वरूपात आगार व्यवस्थापक मुंबई आगार यांच्याकडे ३ ऑक्टोबरला भरले. या मेळाव्यासाठी १७९५ बसेसपैकी प्रत्यक्षात १६२५ बसचा बसेसचा वापर झाला. उर्वरित १७० बसेसचे भरलेल्या पैशांचा परतावा एसटी कोणाला करणार? सामान्य व्यक्तीला बँकेत ५० हजारापेक्षा जास्त रक्कम भरायची असल्यास त्याला अधिकृत ओळखपत्र सादर करावे लागते, मग इतकी मोठी रक्कम भरताना एसटी महामंडळाने त्याची विचारपूस केली का, असा सवाल दानवे यांनी एसटी महामंडळाला विचारला आहे.