राजस्थान, मध्यप्रदेशचा प्रयोग महाराष्ट्रातही?; मुख्यमंत्रिपदावरून विनोद दावडेंचं मोठं विधान
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याच्या आधीपासून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार याची चर्चा जोरात सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडूनही अद्याप मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. दरम्यान आज विनोद तावडे यांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवताना राजस्थान आणि मध्यप्रदेशचा प्रयोग राबवला जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, हा मुद्दा प्रचंड चर्चेत आहे. विधानसभा निवडणूक जाहीर होण्याच्या आधीपासून एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील की नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल, याची चर्चा सुरू आहे. आता ऐन निवडणुकीत महायुतीच्या मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याबाबतच्या चर्चा सुरू आहेत. भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे यांनीही या चर्चेवर भाष्य केलं आहे.
राज्यात महायुतीला बहुमत मिळालं आणि सरकार आलं तर, मुख्यमंत्रिपदासाठी नवी नावं समोर येऊ शकतात. तसंच राजस्थान, मध्य प्रदेशात केलेला प्रयोग महाराष्ट्रातही केला जाऊ शकतो, असे संकेतही त्यांनी दिले आहेत. निकालानंतर राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन मुख्यमंत्री ठरवला जाईल. मात्र निकालानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि भाजपचं केंद्रीय नेतृत्व यासंदर्भात निर्णय घेणार घेईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
महायुतीसंदर्भातील बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
गेल्या आठवड्यात अमित शहा यांनी महायुतीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणूकांआधीच ठरल्याचे संकेत अमित शाहांनी जाहीर प्रचारसभेत दिले आहेत. अमित शाहांनी प्रचार सभेत केलेल्या मोठ्या वक्तव्यानं महायुताचा नवा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा मिळाला असं म्हणायला आता वाव होता. परंतू प्रचार सभेतील अमित शाहांच्या या वक्तव्याने महायुतीतल्या मित्र पक्षांच्या नेत्यांची झोप उडण्याची शक्यता आहे.
महायुती आणि महाविकास आघाडीने मुख्यमंत्रिपदाचा अधिकृत चेहरा जाहीर केलेला नाही. देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसांपूर्वी महायुती शिंदेंच्या नेतृत्त्वात निवडणुका लढेल असं म्हटलं होतं. त्यामुळे सत्ता आली की शिंदे मुख्यमंत्री होतील अशी शक्यता होती तर महायुतीचा तिसरे नेते अजित पवारांनी आपली मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांशा काही लपून राहिलेली नाही. त्यामुळेच अमित शाहांनी एक पाऊल पुढे टाकत मी राज्यभर फिरलो आणि महायुतीचं सरकार येणार असल्याचं म्हणत देवेंद्र फडणवीसांना विजयी करा, असं म्हणत मुख्यमंत्रिपदाची माळ फडणवीसांच्या गळ्यात पडणार असल्याचे संकेत अमित शहा यांनी दिले आहेत.
शिवसेना आणि भाजप युती तोडण्याचं कारण मुख्यंमत्रि पद होतं हे आता महाराष्ट्राच्या राजकारणात लपून राहिलेलं नाही. यावेळीही महायुतीनं मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर न केल्यामुळे संभ्रम निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच शाह भाजपच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन करण्याचे संकेत देऊन मित्र पक्षांना मानसिक तयारी करण्याचा संदेश देत आहेत का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर आज विनोद तावडे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.