
Ajit Pawar Death: अजित पवारांनंतर राष्ट्रवादीची सूत्रं कोणाच्या हाती? पक्षाला नवा चेहरा मिळणार? तिढा सुटणार कसा?
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पक्षाचे नेतृत्व कोणाकडे जाणार आता अशी चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार का की शिंदेंची शिवसेना आणि भाजप अजित पवार यांच्या पक्षाचे नेतृत्व स्विकारणार अशी चर्चा आता सर्वत्र सुरु आहे. मात्र अशातच एक मोठी बातमी समोर आली आहे. अजित पवार यांचा पक्ष शरद पवारांच्या पक्षात विलीन होणार, असं विधान एका बड्या नेत्याने केलं आहे. अजित पवार यांचा झालेला अपघात आणि पक्ष एकत्र येणाचे विधान, यांचा संबंध तर नाही ना, अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest)
आगामी जिल्हा परिषद निवडणूकीची सर्वत्र तयारी सुरु आहे. या निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी एकत्र येत लढण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची युती झाली आहे. यानंतर आता असा दावा देखील केला जात आहे की, निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलिन होणार. असा दावा आमदार राजू खरे यांनी केला आहे. राजू खरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आहेत. त्यांनी सांगितलं होतं की, आगामी निवडणूकीसाठी पुणे आणि सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकीनंतर शरद पवार यांचा पक्ष अजित पवार यांच्या पक्षात विलीन होणार आहे.
Breaking: बारामतीत अजित पवारांच्या विमानाला मोठा अपघात, लँडिंगदरम्यान जमिनीवर कोसळले विमान
अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा सुरु असतानाच अजित पवार यांचा आज अपघातात मृत्यू झाला आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या पक्षाला आता नवीन चेहरा मिळणार का की अजित पवार यांचा पक्ष शरद पवार यांच्या पक्षात विलीन होणार, याबाबत आता अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे नेतृत्व आता शरद पवारांच्या हाती जाणार का की अजित पवारांचे धाकटे पुत्र पार्थ पवार पक्षाचे नेतृत्व हाती घेणार, अशा चर्चांना आता उधान आले आहे.