Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune News: मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी कोट्यवधी खर्च अन् लाडक्या बहिणींसाठी निधीची टंचाई; सामाजिक कार्यकर्त्याची टीका

गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी न मिळाल्याने हजारो महिलांना वेळेवर लाभ मिळत नाही. पण या योजनेसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही आणि त्यामुळे इतर खात्यांतून पैसे वळवावे लागत आहेत

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jun 03, 2025 | 12:41 PM
Pune News: मंत्र्यांच्या दौऱ्यांसाठी कोट्यवधी खर्च अन् लाडक्या बहिणींसाठी निधीची टंचाई; सामाजिक कार्यकर्त्याची टीका
Follow Us
Close
Follow Us:

Majhi Ladki Bahin Yojna:  राज्य सरकारकडून ‘लाडकी बहीण’यासारख्या सामाजिक योजनांसाठी निधी टंचाईचं कारण देत अडथळे आणले जात असताना, दुसरीकडे मंत्र्यांच्या परदेशवारीवर कोट्यवधींचा खर्च केला जात असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केला आहे. कुंभार यांनी २०२५ मध्ये मंत्र्यांनी केलेल्या किंवा नियोजित परदेशभ्रमंतीची यादी सादर करत सरकारवर सडकून टीका केली. “जनतेच्या पैशातून युरोपच्या सहली, फाईव्ह स्टार हॉटेल्स, आलिशान फ्लाईट्स आणि साईटसीइंग सुरू आहे. लोककल्याणासाठी पैसा नाही, पण मंत्र्यांच्या मौजमजेसाठी मात्र कोणतीही अडचण नाही. ही लोकशाहीची थट्टा आहे,” अशी टीका कुंभार यांनी केली आहे.

या परदेश दौर्‍यांवर लाखो रुपयांचा खर्च झाल्याचं सांगत त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.  “हा सर्व खर्च जनतेच्या कररूपी पैशातून केला जात आहे. मंत्री हॉटेल, आलिशान फ्लाइट्स, साईटसीइंग, सगळं काही VIP दर्जात अनुभवत आहेत,”  पण सध्याच्या आर्थिक परिस्थितीत जनतेसाठी महत्त्वाच्या योजनांना निधी दिला जात नसताना मंत्र्यांच्या परदेशवारीवर इतका खर्च करणे कितपत योग्य आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

30 Thousand Suspicious Files: रोख व्यवहारांचे रहस्य? खोतकर यांच्या सहाय्यकाच्या कक्षातून सापडल्या ३० हजार संशयास्पद फाईल्स

राज्य सरकारकडून मंत्र्यांच्या परदेशवारींना ‘शासकीय दौरे’ म्हणून सादर केले जात असले तरी या सहलींचे खरे उद्देश, त्याचा समाजावर होणारा लाभ आणि जनतेपर्यंत त्याचे पडसाद पोहोचत आहेत का, असा गंभीर प्रश्न सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी उपस्थित केला आहे. कुंभार म्हणाले, ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी नाही, पण मंत्र्यांच्या या ‘चैन’साठी कोट्यवधी रुपये सहज मंजूर होतात. मग हा फरक का?”

मधुचंद्रासाठी शिलाँगला जाऊन बेपत्ता झालेल्या जोडप्यापैकी एकाचं सापडला मृतदेह, दुसऱ्याचा शोध सुरु

गेल्या काही महिन्यांपासून ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी निधी न मिळाल्याने हजारो महिलांना वेळेवर लाभ मिळत नाही. पण या योजनेसाठी राज्य सरकारकडे पुरेसा निधी उपलब्ध नाही आणि त्यामुळे इतर खात्यांतून पैसे वळवावे लागत आहेत, असे राज्य सरकारकडून सांगितले जात आहे.  मात्र, मंत्र्यांच्या परदेश दौऱ्यांसाठी मात्र कोट्यवधींचा खर्च सहज मंजूर होतो.

जयकुमार रावल यांचा नुकताच फ्रान्स, नेदरलँड आणि स्वित्झर्लंड दौरा चर्चेचा विषय ठरला आहे, तर त्याचवेळी आणखी काही मंत्र्यांच्या ‘व्हीआयपी टूर’ची यादीही समोर आली आहे. कुंभार यांनी सरकारवर प्रश्न उभा करत म्हणाले की, “जनतेच्या पैशाचा वापर खऱ्या जनकल्याणासाठी व्हायला हवा, परंतु आताच्या काळात ही स्थिती चिंताजनक आहे.”

2025 मध्ये मंत्र्यांचे परदेश दौरे

जयकुमार रावल – युरोप
उदय सामंत – यूएई
इंद्रनील नाईक – जर्मनी
नितेश राणे – नेदरलँड
आशिष शेलार – स्पेन
देवेंद्र फडणवीस व उदय सामंत – दावोस, स्वित्झर्लंड

 

 

 

Web Title: Why are ministers traveling abroad when there is no money for the ladki bhahin scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 12:41 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • devendra fadnavis
  • Maharashtra Politics
  • majhi Ladki Bahin yojna

संबंधित बातम्या

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”
1

OBC शिष्टमंडळाच्या बैठकीनंतर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान; म्हणाले, “खाडाखोड असलेल्या कागदपत्रांच्या…”

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका
2

Maharashtra Politics: “आम्ही हिंदू आहोत, पण..”; पुण्यातून उद्धव ठाकरेंची भाजपवर जोरदार टीका

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
3

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका
4

Maharashtra Politics: “2014 ते 2019 खूप सन्मान दिला मात्र…”; चंद्रकांत पाटलांची ठाकरेंवर जहरी टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.