अर्जुन खोतकर सहाय्यक कार्यालयात ३० हजार संशयास्पद फायली सापडल्या
30 Thousand Suspicious Files : शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. शिंदे शिवसेनेचे आमदार अर्जुन खोतकर यांच्या स्वीय सहायकाच्या खोलातून एक दोन नव्हे तब्ब्ल ३० हजार फाईलींचे घबाड सापडले आहे. या सर्व फाईल्स रोख व्यवहाराशी संबंधित असाव्यात, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पण हे प्रकरण उघडकीस आल्याने अर्जून खोतककर यांच्यासह एकनाथ शिंदेंच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचे आमदार आणि विधीमंडळ अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जून खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या विश्रामगृहातील कक्षात तब्बल ३० हजार फाईल्सचे सापडल्या आहेत. या सर्व फाईल्स धुळे जिल्ह्यातील विविध विभागांशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हे प्रकरण उघडकीस येताच एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आता पोलिसांवरील दबावही वाढला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुळ तक्रारदार आणि उद्धव ठाकरे पक्षाचे माजी आमदार अनिल गोटे यांचा जबाब नोंदवण्यात आला असून अनिल गोटेंनी यासंदर्भात धक्कादायक दावे केल्याची माहिती समोर आली आहे.
Vaishnavi Hagawane case: आत्महत्या की पूर्वनियोजित हत्या? वैष्णवी प्रकरणाचा गुंता वाढतोय
या प्रकरणात पोलिसांनी किशोर पाटील यांच्या नंतर जालन्यातील उदगीर येथील दुसरा संशयित राजू उर्फ राजकुमार व्यंकटराव मोगले (वय ३०) यालाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. याशिवाय पोलिसांनी विश्रामगृहाचे सीसीटिव्ही फुटेज, काही रजिस्टर्स आणि इतर कागदपत्रांचीही तपासणी सुरू केली आहे. दहा दिवसांपूर्वीच हे फुटेज ताब्यात घेतले होते. त्यामुळे अर्जून खोतकरांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिलेलेल्या माहितीनुसार,या प्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांनी मूळ तक्रार केली होती. त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानेच हे प्रकरण उजेडात आले. अनिल गोटे यांनी गुलमोहर शासकीय विश्रामगृहाबाहेर ठिय्या मांडला होता.आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावानेच हा कक्ष आरक्षित कऱण्यात आला होता. याच कक्षात तीस फाईल्सचे घबाड सापडले आहे. त्यामुळे या प्रकरणात कुणाच्या अडचणी वाढणार याची उत्सुकता लागली आहे.
ACB summons to Anjali Damania: राजकारण तापणार! अंजली दमानियांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा
या फाईल्सच्या प्राथमिक तपासणीनुसार, विविध रस्ते प्रकल्प, मारुती कामे, पाटबंधारे योजना, पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि ग्रामीण भागातील विकास कामांशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले आहे. याशिवाय, या फाईल्स महापालिका, जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद अशा विविध शासकीय विभागांशी संबंधित असून, त्या सर्व फाईल्स किशोर पाटील यांच्या ताब्यात होत्या.
या फाईल्सशी संबंधित अधिकारी आणि कंत्राटदारांशी संपर्क करण्यात आला होता क ? त्यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते का? याचा तपास करणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असणार आहे. तीस हजारांहून अधिक फाईल्सच्या ढिगाऱ्याची कसून तपासणी करावी लागणार आहे. दरम्यान, या प्रकरणातील दुसऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केल्यामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकाराचा थेट संबंध काही राजकीय नेत्यांशी आहे का? याबाबत जनतेत आणि तपास यंत्रणांमध्येही प्रचंड उत्सुकता आहे.