इंदूरहून मधुचंद्रासाठी एक जोडपं शिलॉंगला गेला होता. तिथे गेलेलं जोडपं २३ मे पासून बेपत्ता झाले आहे. राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी हे असे बेपत्ता झालेल्या जोडप्याचं नाव आहे. राजा रघुवंशीचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. त्याची पत्नी सोनम अद्यापही बेपत्ता आहे. तिचा शोध पोलीस घेत आहे. अशी इंदूर पोलिसांनी माहिती दिली आहे.
19 वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; चारच महिन्यांपूर्वी झालं होतं लग्न
११ दिवसांनी सापडला मृतदेह
राजाज रागुवंशी आणि सोनम यांचं ११ मे रोजी विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर २० मे रोजी राजा आणि सोनम दोघेही मधुचंद्रासाठी रवाना झाले. त्यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार राजा आणि सोनम हे दोघंही सुरवातीला बंगळुरुला गेले. त्यानंतर बंगळुरुमार्गे हे दोघंही गुवाहाटी येथील कामाख्या मंदिरात गेले आणि त्यांनी तिथे जाऊन दर्शन घेतलं. २३ मे रोजी ते शिलाँगला रवाना झाले. या दोघांच्या मोबाइलचं शेवटचं लोकेशन हे शिलाँग या ठिकाणी दाखवत होतं. या दोघांशी काहीही संपर्क होऊ न शकल्याने राजा आणि सोनम या दोघांचेही भाऊ शिलाँगला रवाना झाले होते आणि त्यांचा शोध घेत होते. हे दोघेही बेपत्ता झाल्याच्या घटनेनंतर ११ दिवसांनी राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाला आहे. त्यामुळे रघुवंशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शिलाँग पोलिसांनी काय माहिती दिली?
शिलाँग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ठिकाणी या जोडप्याने घेतलेली स्कुटी बेवारस अवस्थेत आढळून आली होती त्या ठिकाणापासून २५ किमी अंतरावर राजा रघुवंशीचा मृतदेह आढळून आला आहे. आता पोलिसांची पथकं सोनम रघुवंशीचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त राजेश त्रिपाठी यांनी सांगितलं की जो मृतदेह सापडला आहे त्याची फॉरेन्सिक चाचणी करण्यात येते आहे.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केला शोक
राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम मधुचंद्रासाठी गेले होते. त्यातल्या राजा रघुवंशीचा मृतदेह मिळाल्यानंतर मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दुःख व्यक्त केलं आहे. मेघालय या ठिकाणी मधुचंद्रासाठी गेलेल्या राजा रघुवंशी यांचा मृतदेह मिळाल्याची घटना क्लेशदायक आहे. त्यांची पत्नी सोनम यांचा शोध सुरु आहे. या कठीण काळात माझ्या सहवेदना रघुवंशी कुटुंबासह आहेत ओम शांती अशा आशयाची पोस्ट मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे.
प्रश्न उपस्थित
आता राजा रघुवंशीचा मृतदेह सापडल्यानंतर राजाच्या पत्नीचा शोध सुरु आहे. पोलीस त्यांचा तपास करत आहे अशी माहिती इंदूर पोलिसांनी दिली आहे. ही हत्या आहे कि आत्महत्या? आणि जर हि हत्या असेल तर कोणत्या कारणावरून करण्यात आली. असा प्रश्न उपस्थित होत आहे.
25 लाख पॅकेज असून काढायची अश्लील व्हिडीओ, IIT पदवीधर तरुणीचा धक्कादायक कांड समोर