दरवेळी कॉंग्रेसचाच का होतो पराभव? मल्लिकार्जुन खरगे राहुल गांधींसमोरचं संतापले, म्हणाले...
लोकसभा निवडणुत महाराष्ट्र आणि देशभरात कॉंग्रेस आणि इंडिया आघाडीने भाजपला तगडी टक्कर दिली. सत्ता नसली तरी २३५ जागांपर्यंत मजल मारता आली. मात्र विधानसभा निवडणुकांमध्ये कॉंग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला आहे. मध्य प्रदेश राजस्थान, हरियाणा आणि आता महाराष्ट्रात दारूण पराभव स्वीकारावा लागला. महाराष्ट्रात तर कॉंग्रेसला १६ जागा कशाबशा राखता आल्या. त्यावर आज मलि्लाक मल्लिकार्जुन खरगे यांनी कॉंग्रेसच्या नेत्यांचे राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्या समोरचं कान टोचले.
महाराष्ट्रात २० तारखेला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच २३ नोव्हेंबरला मतदानाची मतमोजणी झाली. मात्र जसं लोकसभेला वातावरण होतं. तसे निकाल लागले नाहीत. महाविकास आघाडीला मोठा पराभव झाला. महायुतीला २३० पेक्षा अधिक जागा मिळाल्या. तर एकट्या भाजपचे ११५ आमदार निवडून आले. राज्यात २८८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीला ४६ जागा मिळाल्या तर काँग्रेसच्या फक्त १६ जागा जिंकता आल्या.
विधानसभेतील दारुण पराभवावरून काँग्रेसच्या नेत्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. निवडणुकीदरम्यान योग्य समन्वय साधता आला नाही. दरम्यान लोकसभेत भरघोस जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभे का पराभूत व्हावं लागलं? यावर कॉंग्रेसकडून आत्मचिंतन सुरू आहे. पराभव कशामुळे झाला याचे विचारमंथन पक्षातून केले जात आहे. आज दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींची बैठक घेतली जात आहे. आज नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी काँग्रेस नेत्यांची कानउघडणी करत त्यांना चांगलंच फैलावर घेतलं.
विधानसभेतील दारुण पराभवावरून काँग्रेसच्या नेत्याच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दरम्यान लोकसभेत भरघोस जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला विधानसभे का पराभूत व्हावं लागलं? याचं कारण शोधलं जात आहे. पराजय कशामुळे झाला याचे विचारमंथन पक्षातून केले जात आहे. यासाठी दिल्लीतील पक्ष श्रेष्ठींकडून बैठक घेतली जात आहे. आज नवी दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या नेतृत्त्वाखाली बैठक झाली. या बैठकीत त्यांनी काँग्रेस नेत्यांची कानउघडणी करत त्यांना चांगलेच फैलावर घेतले.
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवावर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाराजी व्यक्त केली. लोकसभेच्या विजयानंतर तीन महिन्यात असा काय बदल झाला की आपल्याला पराभवाला समोर जावं लागलं, असा प्रश्न त्यांनी काँग्रेस नेत्यांना केला. एकमेकांविरोधातील वक्तव्यांमुळे निवडणुकीत पक्षाचं नुकसान झालं. पक्षांतर्गत होत असलेल्या टीकेमुळे काँग्रेसचा पराभव झाला. त्यावरूनही खरगेंनी नाराजी व्यक्त केली.