Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जयंत पाटलांचा पराभव कुणामुळे?; भाजपच्या बड्या नेत्याने थेट नावच सांगितले

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 13, 2024 | 12:37 PM
जयंत पाटलांचा पराभव कुणामुळे?; भाजपच्या बड्या नेत्याने थेट नावच सांगितले
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 2 उमेदवार विजयी झाले. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा दिलेले शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार जयंत पाटील यांचा मात्र पराभव झाला. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांचा विजय झाला.

पण दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्या गटामुळेच जयंत पाटील यांचा पराभव झाल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. भाजप नेते आशिष शेलार यांनी एक्सवरून (ट्विटर) विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या भाजप उमेदवारांचे अभिनंदन केले आहे. पण त्याचबरोबर ठाकरे गटावरही निशाणा साधला आहे. त्याचवेळी, असे ट्विट करत ठाकरे गट छोट्या पक्षांना संपवत असल्याचा आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.

काय म्हटले आहे आशिष शेलारांनी?

आशिष शेलार यांनी ठाकरे गटानेच जयंत पाटील यांचा ठरवून पराभव केला, असा आरोप केला आहे. त्यामुळे आता मिलींद नार्वेकरांचा विजय आणि जयंत पाटील यांचा पराभव झाल्यामुळे आता भाजपच्या दाव्यालाही बळ आले आहे.  शेलार यांनी एक्सवर ट्विट करत लिहिलं आहे की, “विधान परिषद निवडणूकीत भाजपचे पाचही उमेदवार विजयी. सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन, महाराष्ट्र पाहतोय. लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. मुंबई शिक्षक मतदारसंघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील यांच्या उमेदवाराचा उबाठाने पराभव केला. (गम्मत म्हणजे कपिल पाटीलांच्या समाजवादी गणराज्य पक्षाची स्थापनाच श्रीमान उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत झाली होती.)

विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!

तर आता विधान परिषद निवडणुकीत ही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शेकापचे उमेदवार शेतकरी नेते जयंत पाटील यांचा उबाठाने ठरवून पराभव केला. सोबत असलेल्या छोट्या पक्षांना संपवण्याचे काम कोण करतोय? महाराष्ट्र पाहतोय! छोट्या पक्षांनो तुम्ही अजगराच्या विळख्यात सापडला आहात.’’

विधान परिषद निवडणूकीत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी !
सर्व विजेत्या उमेदवारांचे अभिनंदन !!
महाराष्ट्र पाहतोय… ◆लोकसभा निवडणुकीत उबाठाने स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींना मदत केली नाही. ◆मुंबई शिक्षक मतदार संघात महाआघाडीचे घटक पक्ष असलेल्या शिक्षक भारतीचे नेते कपिल पाटील… pic.twitter.com/4ax2PdKyMl — Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) July 13, 2024

Web Title: Why did jayant patil lose a senior bjp leader directly mentioned the name

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2024 | 12:37 PM

Topics:  

  • Ashish Shelar
  • BJP
  • jayant patil
  • vidhanparishad election 2024

संबंधित बातम्या

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?
1

Pune News: सूस गावात भाजपची विजय पदयात्रा! प्रभाग क्रमांक ०९ मध्ये कमळ फुलणार?

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात
2

Prithviraj Chavan On Mahayuti: “तीन पक्षांचे सरकार लचके तोडतय”, पृथ्वीराज चव्हाणांचा महायुतीवर घणाघात

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू
3

“आमच्याशी लढायचे असेल तर…”; ED च्या ‘त्या’ छाप्यावरून ममता बॅनर्जींनी भाजपविरुद्ध ठोकला शड्डू

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश
4

Maharashtra Politics: अंबरनाथमध्ये रात्रीस खेळ चाले..! अखेर ‘त्या’ 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये पक्ष प्रवेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.