लोकसभा निवडणुकांनंतर आता राज्यातील सर्व पक्षांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले. त्यातच मणिपूर हिंसाचाराच्या संदर्भात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून प्रश्नोत्तरांची फेरी सुरू आहे. दरम्यान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीवर केलेल्या भाष्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरला जाणार का, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली. तसेच जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर जमिनीच्या पातळीवर काय फरक पडला आहे, असा सवाल देखील उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदे केला.
पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार?
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख भागवत यांनी सोमवारी मणिपूरमध्ये वर्षभरानंतरही शांतता नसल्याबद्दल चिंता व्यक्त केली आणि म्हणाले की, संघर्षग्रस्त ईशान्येकडील राज्यातील परिस्थितीचा प्राधान्याने विचार केला पाहिजे. यासंदर्भात पंतप्रधान मोदी मणिपूरला भेट देणार? असा सवाल ठाकरेंनी उपस्थित केला.
‘मला देशाच्या भविष्याची काळजी वाटते’
मला एनडीए सरकारच्या भवितव्याची नाही तर देशाच्या भवितव्याची चिंता वाटत असल्याचे शिवसेना (यूबीटी) नेत्याने म्हटले आहे. शिवसेना (यूबीटी), काँग्रेस आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) यांचा समावेश असलेल्या विरोधी महाविकास आघाडीमध्ये आगामी राज्य विधान परिषदेच्या चार मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी उमेदवारांवर कोणतेही मतभेद नसल्याचेही ते म्हणाले. तसेच ही कुणाची जबाबदारी आहे? आता अब की बारवाले कुठे गेले? आताही पंतप्रधान, गृहमंत्री तिथे जाणार नाही का? काश्मीरमध्ये काय फरक पडला? लोकांचे जीव तर अजूनही जात आहेतच. तीन दिवसांत तीन हल्ले झाले काश्मीरमध्ये. याला जबाबदार कोण? जम्मू-काश्मीरमधील हल्ल्यावरून उद्धव ठाकरेंचं पंतप्रधान मोदींवर टीकास्र केलं आहे.