Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेबांचे स्वीय सहाय्यक उद्धव ठाकरेंच्या मदतीला; नार्वेकरांचा पत्ता कट?

बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे हे ठाकरे कुटुंबियांसोबत होते. त्यानंतर मध्यतरीच्या काळात ते सक्रीय नव्हते. बाळासाहेबांसोबत असताना रवी म्हात्रे यांच्याकडे शाखाप्रमुखांसह, आमदार, खासदार आपल्या समस्या घेऊन रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. त्यावेळी रवी म्हात्रे शिवसैनिकांमधील दुवा होते.

  • By Ganesh Mate
Updated On: Sep 23, 2022 | 01:40 PM
बाळासाहेबांचे स्वीय सहाय्यक उद्धव ठाकरेंच्या मदतीला; नार्वेकरांचा पत्ता कट?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्यातील राजकारणासह शिवसेनेतही (Shivsena) मोठे बदल झाले. राजकीय समीकरणांसोबत शिवसेनेतील अंतर्गत गोष्टीही बदलू लागल्या आहेत. शिवसेनेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सर्वात जवळची व्यक्ती म्हणून मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांचे नाव घेतले जात होते. मात्र, आता शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विश्वासू व्यक्तीने प्रवेश केला आहे. त्यामुळे नार्वेकरांचा पत्ता कट होणार का, अशी चर्चा आहे.

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर बाळासाहेबांच्या मर्जीतील रवी म्हात्रे (Ravi Mhatre) यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांच्या वाढलेल्या वावराबाबत काही दिवसांपासून मोठी चर्चा आहे. २१ सप्टेंबर रोजी शिवसेनेच्या गटप्रमुखांचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात उद्धव ठाकरेंच्या अवतीभोवती रवी म्हात्रे पाहायला मिळाले. मागील काही काळ ते सक्रीय नव्हते. मात्र, आता हातात फाईल घेऊन अचानक रवी म्हात्रेंचा प्रवेश झाल्याने चर्चा होते आहे.

रवी म्हात्रे हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे खास आहेत. ते बाळासाहेबांचे सहाय्यक होते. २००४ पासून ते बाळासाहेबांचे सहाय्यक म्हणून काम पाहत होते. बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे हे ठाकरे कुटुंबियांसोबत होते. त्यानंतर मध्यतरीच्या काळात ते सक्रीय नव्हते. बाळासाहेबांसोबत असताना रवी म्हात्रे यांच्याकडे शाखाप्रमुखांसह, आमदार, खासदार आपल्या समस्या घेऊन रवी म्हात्रे यांच्याशी संपर्क साधायचे. त्यावेळी रवी म्हात्रे शिवसैनिकांमधील दुवा होते.

नार्वेकरांच्या जागी रवी म्हात्रे?
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अनेकांनी उद्धव ठाकरेंचे स्वीय सहाय्यक मिलिंद नार्वेकरांवरही नाराजी व्यक्त केली. १९९४ पासून मिलिंद नार्वेकर शिवसैनिकांशी जोडलेले आहेत. २०१८ मध्ये शिवसेनेचे सचिव म्हणून त्यांची घोषणा करण्यात आली होती. पण, आता रवी म्हात्रेंचा उद्धव ठाकरेंजवळचा वाढलेला वावर पाहता मिलिंद नार्वेकर यांची जागा रवी म्हात्रेंनी घेतली असल्याची चर्चा आहे.

Web Title: With the help of balasahebs personal assistant uddhav thackeray so norwekars address cut nrgm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2022 | 01:40 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • milind narvekar
  • shivsena
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार
1

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल! शिंदे यांनी शरद पवारांशी हातमिळवणी केली! भाजप-अजित पवार यांच्याविरुद्ध लढणार

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?
2

Maharashtra च्या राजकारणात भूकंप? शिवसेनेच्या मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवर बहिष्कार, निवडणुकीआधी काय घडले?

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
3

Rajan Salvi : ठाकरेंची साथ सोडणाऱ्या राजन साळवींना झटका, रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!
4

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.