Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; नागरिक संतप्त

वाहनधारकांना अनेकदा अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात रेल्वे गेट बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भर पावसात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2026 | 01:31 PM
Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; दर्यापूर मार्ग झाला ठप्प

Akola News : रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम संथगतीने सुरु; दर्यापूर मार्ग झाला ठप्प

Follow Us
Follow Us:

अकोला : न्यू तापडियानगर येथील रेल्वे गेटवरील उड्डाणपुलाचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने स्थानिक नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत आहे. पुलाचे प्रत्यक्ष काम वेगाने सुरू होईपर्यंत पूर्ववत हे रेल्वे गेट ऑटोरिक्षा व चारचाकी वाहनांसाठी तातडीने खुले करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. नरेंद्र बेलसरे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी केली आहे. या संदर्भात अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी पुढाकार घेऊन संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत तातडीने तोडगा काढावा, अशी अपेक्षा त्रस्त नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

न्यू तापडियानगर व दर्यापूर मार्गावरून अकोला शहरात प्रवेश करण्यासाठी हा सर्वाधिक महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग मानला जातो. या मार्गावरून अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, रामतीर्थ, करतखेड, म्हैसांग, आपातापा, घुसर, आपोती, गोरेगाव, खरप, लखपुरी आदी गावांतील हजारो नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, व्यापारी आणि नोकरदार दररोज शहरात ये-जा करतात. मात्र, सध्या या मार्गावरून तीनचाकी व चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करण्यात आल्याने वाहनधारकांना अकोट फाईल पुलावरून मोठा वळसा घालून शहरात यावे लागत आहे. यामुळे अकोट फाईल पुलावर वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाला असून, दररोज सकाळी ११ वाजेच्या सुमारास तसेच सायंकाळी ५ वाजल्यानंतर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे.

रुग्णवाहिका अडकल्याने रुग्णांच्या जीविताला धोका

रेल्वे गेट बंद असल्यामुळे अकोट फाईल पुलावरील वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दररोज सकाळी व सायंकाळी निर्माण होणाऱ्या वाहतूक कोंडीत रुग्णांना रुग्णालयात घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकाही अडकून पडत आहेत. त्यामुळे उपचारासाठी होणारा विलंब गंभीर रुग्णांसाठी धोकादायक ठरत असून, अनेकदा नातेवाईकांचीही मोठी धावपळ उडत आहे. ही परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने तातडीने पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

अर्धा तास राहावे लागते ताटकळत

या कोंडीत वाहनधारकांना अनेकदा अर्धा-अर्धा तास ताटकळत राहावे लागत असून, इंधनाचा अपव्यय आणि वेळेचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यात रेल्वे गेट बंद असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना भर पावसात गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकादेखील या कोंडीत अडकत असल्याने गंभीर रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे.

रेल्वे गेट मर्यादित स्वरूपात वाहतुकीसाठी खुले करावे

अनेकदा वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये वादावादी होत असून, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांना हस्तक्षेप करावा लागत आहे. नागरिक प्रशासनाला पूर्ण सहकार्य करतील, मात्र तोपर्यंत नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे गेट मर्यादित स्वरूपात तरी वाहतुकीसाठी खुले करावे.

Govt Action Mode : 1 ऑगस्टपासून सरकार ॲक्शन मोडवर ! साखर साठ्याबाबत घेतला मोठा निर्णय, व्यापाऱ्यांवर कडक नजर

Web Title: Work on the railway crossing flyover is progressing at a slow pace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 01:31 PM

Topics:  

  • akola news

संबंधित बातम्या

‘प्रशासकराज’मुळे रखडला ग्रामीण विकास; स्थानिक स्वराज्य संस्थांवर दीड वर्षापासून लोकप्रतिनिधीच नाही
1

‘प्रशासकराज’मुळे रखडला ग्रामीण विकास; स्थानिक स्वराज्य संस्थांवर दीड वर्षापासून लोकप्रतिनिधीच नाही

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप
2

Akola News: अपघात की घातपात? शिंदे गटाच्या जिल्हाध्यक्षाच्या मृत्यूनंतर राजकीय खळबळ; माजी जिल्हाप्रमुखावर गंभीर आरोप

पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम
3

पावसाचे पुनरागमन खरीप पिकांसाठी संजीवनी; 26.5 टक्के पावसाची अद्यापही तूट कायम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.