अमरावती : शरद पवार साहेब आपण जर मुख्यमंत्री असता तर महाराष्ट्राचे चित्र जरा वेगळे असते असे मोठं विधान मुख्यमंत्री पदावरून केलं, यशोमती ठाकूर यांच्या वक्तव्यामुळे आघाडी सरकारचे सध्याचे असलेले चित्र यशोमती ठाकूर यांच्यासाठी समाधान कारक नाही का असे असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी अमरावती दौऱ्यावर होते. अमरावती येथील डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात शरद पवारांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावर व सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला. या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर याच्यांसह अनेक नेते उपस्थित होते. दरम्यान या कार्यक्रमात मंत्री यशोमती ठाकूर यांनी बोलतांना मुख्यमंत्री पदाबाबद मोठं वक्तव्य केलं.
पवार साहेब आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच राहिलं असतं. पवार साहेब ही काळाची गरज आहे. कोणीही कितीही तीर मारले तरी महाराष्ट्र अस्थिर होणार नाही @PawarSpeaks @bb_thorat @OfficeofUT @AjitPawarSpeaks pic.twitter.com/NE79YEJQZc
— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) April 10, 2022
[read_also content=”सोमय्या पिता-पुत्रांची अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव, आज सुनावणी होणार https://www.navarashtra.com/maharashtra/somaiya-father-and-son-run-to-court-for-pre-arrest-bail-hearing-will-be-held-today-267246/”]
[read_also content=”गुणरत्न सदावर्तेंना आज मुंबई मुख्य महानगरदंडाधिकारी कोर्टापुढे हजर केलं जाणार https://www.navarashtra.com/maharashtra/gunaratna-sadavarte-will-be-present-before-the-mumbai-chief-magistrates-court-today-nrps-267238/”]