Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

सध्या जवळपास सर्वांकडे स्मार्ट मोबाइल असल्याने ऑनलाइन पेमेंट आणि डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे.बहुतेक व्यवहार हे मोबाइलवरूनच केले जाते.

  • By सुरुची कदम
Updated On: May 12, 2026 | 02:00 PM
Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Yavatmal News: एटीएमवर ना गार्ड, ना सीसीटीव्ही! सुरक्षेची जबाबदारी बँकांवर; अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकच नाही

Follow Us
Follow Us:

ग्राहकांना पैसे काढण्यासाठी लांब रांगेत उभे राहावे लागू नये म्हणून राष्ट्रीयीकृत आणि इतर बँकांनी एटीएम केंद्रे स्थापन केली आहेत. जिल्ह्यात लहान-मोठी गावे आणि शहरे यासह एकूण ३०१ एटीएम कार्यरत आहेत. परंतु, यापैकी बहुतेक एटीएम केंद्रे सुरक्षा कर्मचाऱ्यांशिवाय कार्यरत असल्याने एटीएमच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. जिल्ह्यात १२ राष्ट्रीयीकृत बँका, ६ सार्वजनिक क्षेत्रातील बँका, ५ खाजगी बँका आणि अनेक सहकारी बँका कार्यरत आहेत. ग्रामीण आणि शहरी भागात त्यांच्याकडून एटीएम बसवण्यात आले आहेत. सध्या जवळपास सर्वांकडे स्मार्ट मोबाइल असल्याने ऑनलाइन पेमेंट आणि डिजीटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. बहुतेक व्यवहार हे मोबाइलवरूनच केले जाते. त्यामुळे आता एटीएमवर ग्राहकांची गर्दी कमी असल्याने अनेक एटीएम केंद्रे निर्जन अवस्थेत आहेत.(फोटो सौजन्य – istock)

रासायनिक खतटंचाईचे सावट! युद्धजन्य परिस्थितीचा फटका; संतुलित खताचा वापर करण्याचे आवाहन

स्टेट बँक ऑफ इंडिया, युनियन बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक, कॅनरा बँक, इंडियन बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युको बँक इत्यादी बँकांचे जिल्ह्यात शेकडो एटीएम कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे, खाजगी बँकांमध्ये एचडीएफसी, आयसीआयसीआय, इंड्सइंड, डीसीबी, अॅक्सिस बँक, स्मॉल फायनान्स बँक, आयडीबीआय इत्यादी बँकांमध्ये ५० हून अधिक एटीएम आहेत, सहकारी बँकांचे ९० च्यावर एटीएम आहेत. शहरी आणि ग्रामीण भाग मिळून एकूण संपूर्ण जिल्ह्यात ३०१ एटीएम कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील अनेक एटीएम केंद्रांचे दरवाजे तुटलेले आहेत. आत जमिनीवर धूळ, कचरा आणि एटीएममधून निघालेल्या स्लिप दिसतात. काही एटीएम केंद्रे भटक्या कुत्र्यांचे, गायीचे आणि इतर प्राण्यांचे निवासस्थान बनले आहेत. तर खाजगी आणि सहकारी बँकांच्या एटीएममध्ये सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्था चांगली असल्याचे आढळून आले.

जिल्ह्यातील सहकारी बँकांच्या बहुतेश एटीएममध्ये सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही प्रणाली यासह इतर सुविधा आहेत. मात्र अनेक राष्ट्रीयीकृत बँकाचे एटीएम सेंटर हे निर्जनस्थळी आहेत. तसेच यात सुरक्षेकरिता सुरक्षा कर्मचारी नसल्याने एटीएमची सुरक्षा धोक्यात आली आहे. कधी कधी तर या एटीएममध्ये जनावरांनी आपला ठिय्या मांडलेला दिसतो.

कोळसा खाणींमुळे वाढले प्रदूषण! नागरिकांचा श्वास गुदमरतोय; धुळीवर नियंत्रणासाठी हवी ठोस उपाययोजना

66 संपूर्ण जिल्ह्यात सुमारे ३०१ एटीएम कार्यरत आहेत. या सर्व एटीएम केंद्रांमध्ये बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे पूर्णपणे कार्यरत आहेत. तथापि, काही एटीएम केंद्रांवर सुरक्षा रक्षक नाहीत. याबाबत संबंधित बैंक व्यवस्थापकांकडून माहिती घेऊन येथे सुरक्षा रक्षक तैनात करण्याचे निर्देश देण्यात येईल, असे मत ज्ञानेश्वर टापरे, अग्रणी बैंक व्यवस्थापक यांनी व्यक्त केले आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Yavatmal news no guard no cctv at atm security responsibility on banks in many places there is no security guard

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • bank accounts
  • bank of maharashtra
  • Yavatmal

संबंधित बातम्या

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा
1

BOM : बँक ऑफ महाराष्ट्रातील घोटाळ्याबाबत माजी व्यवस्थापकाला 7 वर्षांच्या कारावासाची शिक्षा

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका
2

Yavatmal News: झाडाखाली बसून शिक्षणाचे धडे! गडचिरोलीतील नेमडा येथील प्रकार; जीर्ण इमारतीचा फटका

Multiple Bank Accounts Benefits : वेगवेगळ्या कामांसाठी वेगळे बँक खाते का आवश्यक? जाणून घ्या आर्थिक नियोजनाची सोपी पद्धत
3

Multiple Bank Accounts Benefits : वेगवेगळ्या कामांसाठी वेगळे बँक खाते का आवश्यक? जाणून घ्या आर्थिक नियोजनाची सोपी पद्धत

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी
4

Yavatmal News: प्लास्टिक कोटेड कपातून चहा! नियम असूनही प्रशासनाचे दुर्लक्ष? महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेत स्पष्ट बंदी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.