मुंबई : नागपूरच्या सभेत काल उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका करीत त्यांना नागपूरचा कलंक म्हटले, यानंतर आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे. दरम्यान, कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. आज भाजपा युवक मोर्चाकडून आंदोलन करण्यात येत आहे. तर देवेंद्र फडणवीस यांनी ताबडतोब उत्तर देत यावर ट्विटद्वारे आपली संतप्त प्रतिक्रिया दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari), भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंच्या ‘कलंकीत’ या टिकेवरुन जोरदार हल्लाबोल केला. दरम्यान, या सर्व टिकेला उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत प्रतिउत्तर दिलं.
सर्व योजनांच्या कागदी होड्या करायचा का
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, सध्या महाराष्ट्रात खूप वाईट अवस्था आहे. सरकारचा कारभार कसा सुरु आहे हे सर्व बघत आहेत. सर्व योजना आहेत, पण त्या फक्त कागदावर आहेत. याची अंमलबजावणी होत नसल्याची टिका उद्धव ठाकरेंनी केली.
ज्यांना भ्रष्ट म्हटले तेच आज सत्तेत…
भाजपाने ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत, तेच आज सत्तेत आहेत. भाजपाने हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. तेच आज मांडीला मांडील लावून बसले आहेत. यामुळं ह्यांना मांडी आहे हे तरी समजले. अजित पवारांवर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाने केले होते. अजित पवारांना चक्की पिसिंग…चक्की पिसिंग… असं म्हटलं होते. तेच आज सरकारमध्ये सामील आहेत. मग यांना हे कसे चालते, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
मग मी म्हटल्यावर एवढे झोंबण्याचे कारण काय
गपूरच्या सभेत काल उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadnavis) जोरदार टीका करीत त्यांना नागपूरचा कलंक म्हटले, यानंतर आता फडणवीस विरुद्ध ठाकरे वाद चांगलाच उफाळून आला आहे. दरम्यान, कलंकावरुन वातावरण तापले असून, नागपुरात याचे पडसाद उमटले आहेत. यावर बोलताना ठाकरे म्हणाले की, तुम्ही एखाद्यावर भ्रष्ट म्हणत कलंक लावता, एखाद्या कुटूंबावर भ्रष्टाचाराचे करता, तेव्हा तो देखील कलंकित होतात. मग मी कलंकित म्हटल्यावर एवढे झोबण्याचे कारण काय, असं उद्धव ठाकरेंनी म्हटले.
ही वेळ तुमच्यावर येऊ नये
मी जेव्हा आजारी होतो, तेव्हा आमच्यावर आमच्या तब्बेतीवर बोलले तर चालते. गळ्याचा, कमरेचा पट्टा निघाला, असं वैयक्तिक बोलला की चालते. मग मी जर कलंकित म्हटलं तर एवढी तळपायाची आग मस्तकात का गेली. जेव्हा ही आजाराची शस्त्रक्रियेची वेळ तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला समजेल. पण ही वेळ तुमच्यावर येऊ नये, असं मी म्हणतो.
…तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडेल
सध्या देशात आणि राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होतोय. महाराजांच्या काळात अफझलखानाची स्वारी यायची, याचे उदाहारण देत उद्धव ठाकरेंनी आत्ताची केंद्रीय तपास यंत्रणा ही देखील अफझलखानाची स्वारी असं म्हटलं आहे. कारण संपूर्ण कुटूंबाला संपविण्याचे काम करताहेत, अशी टिका उदधव ठाकरेंनी भाजपावर केली.