कल्याण : भाजप खासदार (BJP MP) व कुस्ती महासंघाचे अध्यक्ष (President Wrestling Federation) बृजभूषण सिंह (Brijbhushan Singh) यांच्यावर महिला कुस्तीपटूंनी (Woman Wrestlers) लैंगिक छळाचे आरोप (Allegations of Sexual Harassment) केले आहेत. याबाबत काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
बृजभूषण सिंह यांच्या विरोधात आज युवक काँग्रेसने (Youth Congress) कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौक (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk Kalyan West) येथे ठिय्या आंदोलन (Thiya Movement) केलं. या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळया फीती बांधून भाजप सरकारविरोधात घोषणा करत निषेध नोंदवला. बृजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल होऊन चार ते पाच महिने झाले असून अद्याप कारवाई केली नसल्याने बृजभूषण सिंह यांना अटक करून तात्काळ त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी कल्याण युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली.
[read_also content=”Motorola ला भारतातील सर्वोत्कृष्ट 5G स्मार्टफोन ब्रँड म्हणून मिळाली मान्यता; वाचा का ठरलाय सरस https://www.navarashtra.com/technology/motorola-recognized-as-the-best-5g-smartphone-brand-in-india-nrvb-397021.html”]
भाजप नेते नेहमीच काही ना काही गैरवक्तव्य करून समाजामध्ये संभ्रम निर्माण करतात. लोकांच्या भावना दुखावण्याचे काम करतात. यावेळी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी कुस्तीपटूंबद्दल गैरवर्तन आणि अपमान केला आहे. या अपमानाच्या विरोधात युवक काँग्रेसने खेळाडू आणि पत्रकारांच्या समर्थनार्थ ठिय्या आंदोलन केले असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेन चोरघे आणि कल्याण जिल्हाध्यक्ष जपजित सिंग यांनी दिली.
यावेळी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विरेन चोरघे, युवक काँग्रेसचे कल्याण जिल्हा अध्यक्ष जपजित सिंग, ब्लॉक अध्यक्ष शकील खान, प्रवीण साळवे, महिला जिल्हाध्यक्ष कांचन कुलकर्णी, मुन्ना श्रीवास्तव आदी पदाधिकारी आणि कार्कर्ते सहभागी झाले होते.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : 9 May 2023, कसा जाईल आजचा दिवस; वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/today-daily-horoscope-9-may-2023-rashibhavishya-in-marathi-nrvb/”]