Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘NEET’ पेपरफुटीवरुन युवक काँग्रेस आक्रमक; भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन

फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 14, 2026 | 11:20 AM
‘NEET’ पेपरफुटीवरुन युवक काँग्रेस आक्रमक; भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन

‘NEET’ पेपरफुटीवरुन युवक काँग्रेस आक्रमक; भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन

Follow Us
Close
Follow Us:
  • केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा
  • ‘NEET’ पेपरफुटीवरुन युवक काँग्रेस आक्रमक
  • भाजप सरकारविरोधात तीव्र आंदोलन
मुंबई : देशातील तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली फोर्ट परिसरातील राज्याच्या CET सेल कार्यालयासमोर मुंबई युवक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग घेत भाजपा सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

 

नीट पेपरफुटी प्रकरणी भाजपा सरकारवर टीका करत मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन म्हणाल्या की, “नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नांवर सरकारने बुलडोझर फिरवला आहे. या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. तसेच विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.”

त्या पुढे म्हणाल्या की, “‘NEET’ पेपरफुटी प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी संयुक्त संसदीय समिती (JPC) स्थापन करण्यात यावी. या प्रश्नपत्रिका फुटीमागील संपूर्ण साखळी भाजपाशी संबंधित लोकांकडून चालवली जात असून, बेकायदेशीर मार्गाने विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले जात आहे. आम्ही सर्वजण मिळून या अन्यायाविरोधात लढा देऊ आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देऊ.”

झीनत शबरीन यांनी पुढे आरोप केला की, “ज्या NTA महासंचालकांच्या कार्यकाळात २०२४ ची ‘NEET’ परीक्षा प्रश्नपत्रिका फुटली, त्याच व्यक्तीची छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे ‘प्रधान सल्लागार’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिका फुटीच्या घोटाळ्यात सहभागी असलेल्या लोकांना भाजप सरकारकडून बक्षीस म्हणून मोठी पदे दिली जात आहेत.”

या आंदोलनात मुंबई युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पंकज चौधरी, महासचिव तेजस चांदूरकर, आसिफ खान, गुरमन सिंग, गणेश शेगार, मितेश सोनकर, संतोष यादव, जिल्हाध्यक्ष शेखर जगताप, शिव यादव, अब्दुल समद तसेच विधानसभा अध्यक्ष इम्रान खान, प्रसन्न रांदिवे, आशिष सरोज, अल्तमेश कुरेशी, राहुल पेडणेकर, राज तुरेराव, सचिन, बृजमोहन यादव, सोहेब, मझहर आणि अबुतालिब यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभागी झाले होते या सर्वांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

हे सुद्धा वाचा : पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात अन्…; नाना पटोलेंची टीका

Web Title: Youth congress protests in mumbai over neet paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • BJP
  • Congress
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Keralam New CM: व्ही.डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्रीपदी; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा
1

Keralam New CM: व्ही.डी सतीशन केरळचे नवे मुख्यमंत्रीपदी; काँग्रेसकडून अधिकृत घोषणा

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट
2

NEET UG 2026: नीट परीक्षेचा पेपर नक्की छापला जातो कुठे? कडक सुरक्षा असूनही पेपर फुटलाच कसा? वाचा हा विशेष रिपोर्ट

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात अन्…; नाना पटोलेंची टीका
3

पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनाला भाजपा मंत्र्यांकडूनच बगल, स्वतः ऐशोआरामात अन्…; नाना पटोलेंची टीका

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…
4

Maharashtra Politics: सत्ताधारीच भांडले! सातारा भाजपमध्ये मतभेद; उदयनराजे भोसले यांनी थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.