Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल, मायाचा अंगाचा थरकाप उडवणारा वार!

कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत.

  • By चेतन बोडके
Updated On: Jun 28, 2025 | 11:53 AM
बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल, मायाचा अंगाचा थरकाप उडवणारा वार!

बाल जगदंबेसमोर नव्या संकटाची चाहूल, मायाचा अंगाचा थरकाप उडवणारा वार!

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील अत्यंत लोकप्रिय मालिका आई तुळजाभवानी मध्ये एकीकडे देवी तुळजाभवानीचं मायाळूपण, करुणा आणि शक्ती दाखवणाऱ्या कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहेत, तर दुसरीकडे असुरीशक्तीचे प्रतिनिधित्व करणारी माया आता उघडपणे आक्रमणाच्या तयारीत दिसते आहे. येत्या रविवारी २९ जूनच्या विशेष भागात मायाचा पहिला घातक वार घडणार असून, हा क्षण प्रेक्षकांसाठी अंगावर काटा आणणारा ठरणार आहे. तेव्हा नक्की बघा ‘आई तुळजाभवानी’ २९ जून दु. ३:००, रात्री ९:०० वा. फक्त आपल्या कलर्स मराठीवर!

“रात्री १ वाजता तिचा मित्र आला अन्…”, शेफाली जरीवालाच्या बिल्डिंगच्या वॉचमनचा मोठा खुलासा; मध्यरात्री काय घडलं?

मायाच्या हातातल्या पाच कवड्या तिच्या योजनांचं प्रतीक आहेत. यातील एक कवडी ती उचलते आणि जगदंबेला उद्देशून बोलते “तयार रहा जगदंबा, माझा पहिला वार सहन करायला.” या शब्दांमागे मायाच्या दुष्ट मनसुब्यांची सुरूवात स्पष्ट होते. साध्या स्त्रीच्या वेशात माया थेट जगदंबेच्या घरात प्रवेश करते. स्वयंपाकघरात भांड्यात शिजत असलेल्या अन्नात ती एक मायावी द्रव मिसळते, त्या द्रव्यामुळे सगळे जेव्हा दीर्घ निद्रेत जाणार तेंव्हा जगदंबाला माया तिच्यासोबत घेऊन जाण्याचे जाळ रचते. मायाच्या चेहऱ्यावर यावेळी दिसणारे असुरी हास्य तिच्या घातक नियोजनाचा प्रत्यय देते, विश्वासाचं रूप घेऊन माया देणार मृत्यूचा घास.

इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा झाली आई, ठेवलं युनिक नाव; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद

माया जेवणाच्या वेळी स्वतःच्या हाताने जगदंबेला घास भरवते, तिच्या चेहऱ्यावर मायाळूपणा पण डोळ्यांत मात्र कपट. दुसऱ्या हातात कवडी कुस्करून ती तिच्या कावेबाज योजनेचा आरंभ करते. गंगाई आणि जनकबाबा बाजूला जेवत असताना सगळं काही सामान्य वाटतंय, पण त्या निरागस अन्नघासामागे आहे एक भयावह कट आहे. मायाचा वार जगदंबा कसा परतवणार? याचं उत्तर मिळेल रविवार २९ जूनच्या विशेष भागात !! पहा आई तुळजाभवानी रविवार, दु. ३:०० वा. आणि रात्री ९:०० वा., फक्त कलर्स मराठीवर !!

Web Title: Aai tuljabhavani serial latest updates sunday 29 june telecast special episode

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial update
  • serial update
  • tv serial

संबंधित बातम्या

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
1

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
2

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
3

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका
4

Kamali TRP : टीआरपीच्या शर्यतीत ‘कमळी’ अव्वल; ठरलं तर मग’ला मागे टाकत बनली महाराष्ट्राची नंबर १ मालिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.