इलियाना डिक्रुझ दुसऱ्यांदा झाली आई, ठेवलं युनिक नाव; फोटो शेअर करत व्यक्त केला आनंद
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आता दुसऱ्यांदा आई झाली आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आई होणार असल्याचे घोषित केले. इलियानाने ऑगस्ट २०२४ मध्ये पहिल्यांदा एका गोंडस मुलाला जन्म दिला होता. आता त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा अभिनेत्रीने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. काही तासांपूर्वीच इलियानाने इन्स्टाग्रामवर बाळाचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करताच चाहत्यांसह अनेक बॉलिवूड आणि हॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
इलियाना डिक्रुझने मायकल डोलनसोबत १३ मे २०२३ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर एका वर्षातच इलियाना आणि मायकल आई- बाबा झाले. त्यानंतर आता दुसऱ्या वर्षातही इलियाना आणि मायकल दुसऱ्यांदा आई- बाबा झाले आहे. अभिनेत्री इलियाना डिक्रुझने १९ जून २०२५ रोजी दुसऱ्यांदा गोंडस बाळाला जन्म दिलेला आहे. अभिनेत्री आपल्या बाळाचं नाव “Keanu Rafe Dolan” (केनू राफे डोलन) असं ठेवलं आहे. बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनंतर अभिनेत्रीने ही आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या पोस्टवर सर्वांनी तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
“आमची हृदय खूप भरुन आले आहेत” असं कॅप्शन देत इलियानाने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केलेली आहे. तिने शेअर केलेल्या पोस्टवर प्रियंका चोप्रा- जोनास, झहीर इक्बाल, आथिया शेट्टी, समांथा रुथ प्रभू, नेहा पेंडसे, करणवीर शर्मा, सोफी चौधरी, रिद्धीमा तिवारीसह अनेक सेलिब्रिटींनी इलियानाला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत इलियानाने तिच्या लग्नाच्या बातम्यांना आणि अफवांना ब्रेक लावला आहे. इलियाना डिक्रूझने मुलाखतीदरम्यान मायकेल डोलनबद्दल मौन बाळगले पण जेव्हा तिला विचारण्यात आले की त्याने तिला किती पाठिंबा दिला तेव्हा ती भावूक झाली.
मायकेलसोबतच्या आयुष्याविषयी बोलताना इलियाना म्हणाली की, “विवाहित आयुष्य खूप छान चालले आहे. मला त्यात काय आवडते हे सांगणे खरोखर कठीण आहे. मला खरोखर विचार करावा लागेल कारण प्रत्येक वेळी मी उत्तर देते तेव्हा काहीतरी वेगळे घडते. त्याने मला माझ्या सर्वात वाईट, माझ्या सर्वात वाईट वेळी पाहिले आहे. त्याने मला माझ्या सर्वोत्तम काळातही पाहिले आहे. तो पहिल्या दिवसापासून खंबीर आहे. तो नेहमीच माझ्या पाठिशी उभा राहिला आहे आणि तेच आहे.” अभिनेत्रीने ही मुलाखत ‘दो और दो प्यार’ या बॉलिवूड चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यानची आहे.