Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Silkayara 41: सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मोठ्या पडद्यावर; Aamir Khan प्रॉडक्शन्सची ‘सिल्कयारा 41’ची घोषणा

उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेवर आधारित 'सिल्कयारा 41' चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स, माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि कबीर खान फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा चित्रपट साकारला जाणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 02:51 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

उत्तराखंडमधील गाजलेल्या सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेवर आधारित ‘सिल्कयारा 41’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. आमिर खान प्रॉडक्शन्स (भारत), माइंड ब्लोइंग फिल्म्स (ऑस्ट्रेलिया) आणि कबीर खान फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने या चित्रपटाची निर्मिती होणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या सहकार्याने साकारला जाणारा हा चित्रपट मानवी जिद्द, धैर्य आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याची प्रेरणादायी कथा मोठ्या पडद्यावर मांडणार आहे.

‘सिल्कयारा 41’ हा चित्रपट उत्तराखंडमधील सिल्कयारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांच्या ऐतिहासिक बचाव मोहिमेवर आधारित आहे. या मोहिमेत महत्त्वाची भूमिका बजावणारे जागतिक कीर्तीचे टनेलिंग तज्ज्ञ आणि ऑस्ट्रेलियाचे स्थानिक हिरो अर्नोल्ड डिक्स यांच्या योगदानालाही चित्रपटात विशेष स्थान देण्यात आले आहे.

चित्रपटाची कथा ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध पटकथालेखक अँड्र्यू अनास्टासिओस यांनी लिहिली आहे. तर ‘बजरंगी भाईजान’ आणि ’83’ यांसारखे गाजलेले चित्रपट दिग्दर्शित करणारे राष्ट्रीय पुरस्कार विजेते कबीर खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. भारतीय आणि ऑस्ट्रेलियन चित्रपटसृष्टीतील सर्जनशीलता, कथाकथन आणि निर्मिती कौशल्याचा अनोखा संगम या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा पहिला लूक प्रदर्शित; पोस्टरमध्ये लपली आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखलंत का?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वाढत्या द्विपक्षीय संबंधांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. सहकार्य, विश्वास आणि मानवी जिद्दीचा संदेश देणारा हा चित्रपट दोन्ही देशांमधील सांस्कृतिक नातेसंबंध अधिक दृढ करणारा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


या चित्रपटाबद्दल बोलताना निर्माता आमिर खान म्हणाला, “माइंड ब्लोइंग फिल्म्स आणि आमिर खान प्रॉडक्शन्स यांच्यातील या विशेष सहकार्याची घोषणा करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. सिल्कयारा बोगदा बचाव मोहिमेची कथा मला मनापासून भावली. प्रतिकूल परिस्थितीत धैर्य, जिद्द, बुद्धिमत्ता आणि माणुसकीचा विजय दर्शवणारी ही प्रेरणादायी कथा आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया नव्या सहकार्याच्या पर्वात प्रवेश करत असताना या चित्रपटाची घोषणा करणे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. दोन्ही देश एकत्र येऊन आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि मानवी जिद्दीचा विजय जगासमोर मांडत आहेत.”

Aamchya Ladkya Naik Bai Serial: ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले; ‘आई कुठे काय करते’शी केली तुलना

सत्य घटनेवर आधारित ‘सिल्कयारा 41’ हा चित्रपट आता प्रेक्षकांच्या उत्सुकतेचा विषय ठरला असून, या प्रेरणादायी कथेला कबीर खान मोठ्या पडद्यावर कशा पद्धतीने साकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Aamir khan productions announces silkyara 41 inspiring story of the silkyara tunnel rescue to hit the big screen

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Aamir Khan
  • Entertainement News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली
1

Aarti Solanki On Balancing Devi: बॅलन्सिंग देवीच्या मूर्तीवर आरती सोळंकीचा संताप; ‘कला’च्या नावाखालील प्रकारावर भडकली

Onkar Bhojane On Milind Kawde:  दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर
2

Onkar Bhojane On Milind Kawde: दिग्दर्शकांच्या आरोपांवर ओंकार भोजनेची पहिली प्रतिक्रिया; ‘त्या’ कारणामुळे प्रमोशनला नव्हता हजर

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद
3

Drishyam 3: अजय देवगणच्या ‘दृश्यम ३’मध्ये ‘या’ मराठी अभिनेत्रीची पुन्हा Entry; पोस्टमधून व्यक्त केला आनंद

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?
4

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.