गेल्या अनेक दिवसापासून देशातली बडे नेत्यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. नुकतचं अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate ) टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांना नव्याने समन्स बजावले आहे. आता ईडीची (ED) नजर सिनेसृष्टीवरही गेली असून बॅालिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीनं समन्स बजावला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीर कपूर हा ॲपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीनं केला आहे.
सौरभ चंद्राकर प्रकरणाशी संबध
काही दिवसापुर्वी सौरभ चंद्राकर हा ईडीच्या जाळ्यात अडकला होता. भिलाई येथील महादेव बेटिंग ॲप चालवणारा सौरभ चंद्राकर हा चौकशीच्या फेऱ्यात अडकला होता. त्याने कथितपणे त्याच्या स्वत: च्या भव्य लग्नासाठी 200 कोटी रुपये रोख खर्च केले, ज्यात खासगी जेट भाड्याने घेणे आणि सेलिब्रिटी परफॉर्मन्सचा समावेश आहे. या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती, असंही म्हटलं जात आहे. सौरभवर स्टार्सना पैसे दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होची. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
Actor Ranbir Kapoor summoned by Enforcement Directorate on 6th October, in connection with Mahadev betting app case