(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
उन्हाळ्या आला की आपल्याला लगेचच कैरी ची चव चाखावीशी वाटते. कैरी जशी आंबट गोड असते तसेच नाते आपल्याला नवरा – बायको यांच्यामध्ये पाहायला मिळते. आता यावरच आधारित ‘कैरी’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जो येत्या १२ डिसेंबरला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे आणि याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. बरं आता या उत्सुकतेत भर घालायला ‘कैरी’ सिनेमातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे नवकोर रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे, जे नक्कीच रसिकांना आवडणार आहे. अल्पावधीतच या गाण्याला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरलं आहे. कारण कोकणातील वातावरणात शूट झालेल हे गाणं सध्या आपल्यालाही कोकणची आठवण करून देताना दिसत आहे.
शिंदेंच्या टीकेनंतर कुणाल कामराने RSS वर साधला निशाणा, टी-शर्ट घालून उडवली थट्टा
या गाण्याची आणखी एक खासियत म्हणजे या गाण्यात मराठी सिनेसृष्टीतील दोन लोकप्रिय चेहरे दुसऱ्यांदा मोठ्या स्क्रीनवर एकत्र दिसणार आहेत. अभिनेत्री सायली संजीव आणि अभिनेता शशांक केतकर ही जोडी ‘कैरी’ या सिनेमातून पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहे. तर ‘कैरी’ या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे, सिद्धार्थ जाधव, अरुण नलावडे, सुलभा आर्या हे दिग्गज कलाकारही मुख्य भूमिकेत असल्याचे दिसते आहे. ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात शशांक आणि सायली यांची रोमँटिक केमिस्ट्री दिसत आहे. एकमेकांच्या प्रेमात बेधुंद झालेलं हे जोडपं ते त्यांच्या संसाराची सुरुवात इथवरचा त्यांचा रोमँटिक प्रवास ‘नारळी पोफळीच्या बागा’ या गाण्यात पाहायला मिळत आहे.
‘असुरवन’ चित्रपटाची टीम प्रमोशनसाठी नाशिकमध्ये, पंचवटी घाटावर पार पडली गोदा आरती
नॅशनल अवार्ड विनिंग दिग्दर्शक शंतनू गणेश रोडे यांचा रोमँटिक थ्रिलर ‘कैरी’ हा सिनेमा येत्या १२ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. प्रदर्शनापूर्वीच चित्रपटातील ‘नारळी पोफळीच्या बागा’ या रोमँटिक सॉंगने चित्रपटाची उंची आणि उत्सुकता वाढवली आहे. या गाण्याचे गीत मनोहर गोलांबरे यांचे असून संगीताची जबाबदारी निषाद गोलांबरे यांनी सांभाळली आहे. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात शूट झालेलं ‘नारळी पोफळीच्या बागा’ हे गाणं आणि सायली-शशांकचा रोमँटिक अभिनय साऱ्यांच लक्ष वेधून घेत आहे.






